वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

रानडुकरांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू**भद्रावती तालुक्यातील कचराळा येथील घटना*

*रानडुकरांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू*

*भद्रावती तालुक्यातील कचराळा येथील घटना*
 
अतुल कोल्हे भद्रावती :-
 शेतातून बैलबंडी घेऊन आपल्या घराकडे जात असता रस्त्यात रानडुकरांच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात एका 54 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कचराळा गावातील शेत शिवारात घडली. मधुकर नारायण येरगुडे, वय 54 वर्ष राहणार कचराळा असे या मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. सदर शेतकरी हा सायंकाळच्या सुमारास शेतातून आपल्या घराकडे येत असताना रस्त्यात रानडुकरांचा एक कळप आडवा आला. अचानक आडवा आलेल्या कळपामुळे मधुकर येरगुडे यांचे संतुलन जाऊन ते बैलबंडी वरून खाली पडले असता रानडुकरांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जबर जखमी केले. गंभीर अवस्थेत त्यांना चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या मृत्यूमुळे गावात सर्वत्र हळहळ  व्यक्त होत आहे.


Comments