वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*कुटुंब बाहेर गावी गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी मारला डल्ला**गोविंद ले-आउट मध्ये घरफोडी : आठ तोडे सोने व रोख दहा हजार केले लंपास*

*कुटुंब बाहेर गावी गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी मारला डल्ला*

*गोविंद ले-आउट मध्ये घरफोडी : आठ तोडे सोने व रोख दहा हजार केले लंपास*

अतुल कोल्हे भद्रावती :-  
                शहरातील गोविंद लेआउट येथे राहणारे कुटुंब पाच दिवसासाठी बाहेर गावी गेले असता अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून आठ तोडे सोने व रोख रक्कम दहा हजार चोरी केल्याची तक्रार भद्रावती पोलिसात शनिवारी दाखल केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
भाऊराव होकम राहणार गोविंद ले-आउट येथील कुटुंब दिनांक १ जुलाई रोज सोमवारला बाहेर गावी गेले होते व दिनांक ५ जुलै शुक्रवारला घरी परत आले असता या पाच दिवसाच्या कालावधीत घराला ताला असतांना अज्ञात ओट्याने घरात प्रवेश करून लोखंडी अलमारी मध्ये ठेवलेले १९८५ मधील लग्नाचे सोन्याचे दागिने व दहा हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याचे कळले. याप्रकरणी भद्रावती पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. ठानेदार बिपीन इंगळे यांनी घटनास्थळी फिंगरप्रिंट एक्सपर्ट व श्वान पथक यांना प्राचारण केले मात्र अज्ञात चोरट्यांचा शोध लागला नाही. या अज्ञात चोरट्यांवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस ) कलम ३०५ ( ए )  ३३१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments