वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*सफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी प्रशासन व सरकारशी लढा सुरूच ठेवणार :- गोविंदभाई परमार*

*सफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी प्रशासन व सरकारशी लढा सुरूच ठेवणार :-  गोविंदभाई परमार* 

 अतुल कोल्हे भद्रावती :-
              सफाई कर्मचाऱ्यांचे हाल समजून प्रशासन व शासन यांच्यात समन्वय साधून न्याय करतात असे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदभाई परमार, यांचा सत्कार राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग, भारत सरकारचे माजी सदस्य व भारतीय सुदर्शन समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप हाथीबेड यांच्या तर्फे शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला.   परमार हे तीन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते.
       यावेळी रविभवन, नागपूर येथे सफाई कर्मचाऱ्यांची विभागीय आढावा बैठक पार पडली असुन समाज व सफाई कर्मचारी संघटना मजबूत करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. 
 राष्ट्रीय कार्यकारिणी व राज्य कार्यकारिणीचा विस्तार करून अनेक नव्या नियुक्त्या करण्यात आल्या.  राष्ट्रीय पदाधिकारिंच्या सर्वानुमते मा. दिलीप हाथीबेड यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी तर बबलू गंगाखेडे यांची नागपूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
                आयोजित तीन दिवसीय दौऱ्यात अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष घनश्याम डकहा, महाराष्ट्र राज्य माजी सरचिटणीस संजय राजसेवाती, महाराष्ट्र राज्य माजी सचिव विक्की बढेल, गडचिरोली प्रभारी ओंकार बोहत, जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ प्रदीप पाटील, प्रा. नागपूर शहर अध्यक्षा जितू मस्ते व नागपूर शहर महिला कार्यकारिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी राष्ट्रीय अध्यक्षांनी दिलीप हाथीबेड यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



Comments