वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

अरबिंदो कंपनीच्या कामगाराला मारहाण*

*अरबिंदो कंपनीच्या कामगाराला मारहाण*

अतुल कोल्हे भद्रावती - 
            तालुक्यातील अरबिंदो रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कामगाराला बेलोरा येथील एका युवकाने वाद घालून मारहाण केल्याची घटना दि. १२ जुलै शुक्रवारला दुपारी २.०० वाजताचे दरम्यान घडली. याप्रकरणी त्या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रज्वल प्रवीण बांदुरकर अरबिंदो कंपनी असे तक्रार कर्त्याचे नाव आहे. तर विलास परचाके वय ४८ राहणार बेलोरा असे मारहाण करणाऱ्या युवकाचे नाव आहे. अरबिंदो खुल्या कोळसा खाणीचे अधिकृतरित्या या परिसरात काम चालू आहे. त्याकरता जिल्हा परिषद रस्त्याने कंपनीची वाहतूक होत असते हेच कारण पकडून विलास परचाके हा गेल्या काही दिवसापासून कंपनी परिसरात येऊन वाद घालत होता दिनांक १२ रोज शुक्रवारला येथील कामगार  प्रज्वल बांदुरकर याचेशी वाद घालून मारहाण केली. या घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात दाखल करण्यात आली आहे.


Comments