वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविन्द्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चा गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात**विद्यार्थ्यांंना शालेय साहित्य गणवेश वितरण*

*स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविन्द्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चा  गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात*
*विद्यार्थ्यांंना शालेय साहित्य गणवेश वितरण*

वरोरा:-  स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविन्द्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चा  गरजू विद्यार्थ्यांना  ट्रस्टचा स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजना अंतर्गत शैक्षणिक दत्तक घेऊन मदतीचा हात दिला.  तालुक्यातील किसान विद्यालय माढेळी येथील इयत्ता नववी आर्यन गौतम कांबळे व  इयत्ता सहावी अनन्या गौतम कांबळे या दोन्ही भावंडाना
स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविन्द्र शिंदे चॅरिटेबल  ट्रस्टचा स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजना अंतर्गत शैक्षणिक दत्तक घेऊन मदतीचा हात दिला . 
वडिलांची प्रकृती ठीक नसून मोलमजुरी करून कुटुंबांचा उदरनिर्वाह त्यांची आई करीत असते.  सामाजिक कार्यकर्ते अभिजित कुडे यांच्या पुढाकाराने त्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश वितरण करण्यात आले.  त्या दोन्ही भावंडाना  ट्रस्टच्या वतीने शैक्षणिक साहित्य सामाजिक कार्यकर्ते अभिजित कुडे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. 
यावेळी त्यांची आई सुनीता कांबळे,  कार्तिक राऊत, रोशन भोयर, शुभम हीवरकर,  प्रमोद रेवतकर, उत्तम तडस उपस्थित होते. 
गौतम कांबळे यांनी व्यक्त केली ट्रस्ट विषयी कृतज्ञता 
माझी प्रकृती बिघडली त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्या पत्नीवर आली मोलमजुरी करून ती कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत पण माझ्या आजारामुळे आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. रविन्द्र शिंदे यांच्या ट्रस्ट कडून मिळाल्याने मदतीने चिंता दूर झाली असून नेहमी पाठीशी आहे असा आधार दिला.  अभिजीत कुडे यांनी कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास तत्पर आहे असा आधार दिला असे गौतम कांबळे म्हणाले.

Comments