वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

एम्टा कोळसा खान कंपनीच्या मुख्य अभियंत्यास थापड मारल्या प्रकरणी आंदोलनकर्त्यांवर भद्रावती पोलिसात गुन्हे दाखल**प्रवीण काकडे, निलेश भालेराव व अन्य सात आंदोलनकर्त्यांचा समावेश*

*एम्टा कोळसा खान कंपनीच्या मुख्य अभियंत्यास थापड मारल्या प्रकरणी आंदोलनकर्त्यांवर भद्रावती पोलिसात गुन्हे दाखल*

*प्रवीण काकडे, निलेश भालेराव व अन्य सात आंदोलनकर्त्यांचा समावेश*

अतुल कोल्हे भद्रावती :-
             दिनांक १९ रोज बुधवार ला बरांज येथील कर्नाटका एमटा कोळसा खान कंपनीत काँग्रेस तर्फे करण्यात आलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनादरम्यान कर्नाटक एम्टा कंपनीचे अधीक्षक ( मुख्य ) अभियंता यश शिवाप्रसाद यांना थापड मारल्या प्रकरणी भद्रावती पोलिसात दिनांक 19 रोज बुधवार ला रात्रो आठ वाजता प्रवीण काकडे, निलेश भालेराव व अन्य सात आंदोलनकर्त्यांवर  संबंधित गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बरांज येथील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या घेऊन काँग्रेस तर्फे खा. प्रतीभा धानोरकर यांच्या नेतृत्वात सदर कंपणी परिसरात आंदोलन करण्यात आले होते. सदर आंदोलनादरम्यान खासदार प्रतीभा धानोरकर यांच्याशी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांविषयी कंपणी अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असताना सदर आंदोलनकर्ते हे आक्रमक झाले व या आंदोलनकर्त्यांनी कंपनीच्या कंपनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करीत कंपनीचे अधीक्षक मुख्य अभियंता यश शिवाप्रसाद यांना थापड मारली. त्यानंतर या प्रकाराची तक्रार यश शिवाप्रसाद यांनी भद्रावती पोलिसात केली. त्यानुसार सदर आंदोलन कर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

Comments