वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*पतंजली योग समितीतर्फे योग साधना व रक्तदान शिबिराचे आयोजन*

*पतंजली योग समितीतर्फे योग साधना व रक्तदान शिबिराचे आयोजन*

अतुल कोल्हे भद्रावती :-
                     पतंजली योग समिती भद्रावती तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शहरातील मुर्लीधर पाटील गुंडावार लान येथे दिनांक 21 रोज शुक्रवारला सकाळी आठ वाजता योग साधना तथा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी पतंजली योग समिती भद्रावतीचे अध्यक्ष रमेश मालपाणी, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रफुल चटकी,सामाजीक कार्यकर्ते  धनराज अस्वले, आशाताई देवाळकर, प्रकाश आस्वले आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी योग प्रशिक्षक अनंता मत्ते व सुनील वैद्य यांनी उपस्थित नागरिकांना योगाचे धडे दिले व योगाबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यानंतर एका रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 38 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलनासाठी ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथील वैद्यकीय पथकाने सहकार्य केले. सदर कार्यक्रमाला शहरातील विविध संघटनांचे प्रतिनिधी व नागरिक सहभागी झाले होते. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी पतंजली योग समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

Comments