वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*इनरव्हील क्लब च्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वितरण*

*इनरव्हील क्लब च्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वितरण*

अतुल कोल्हे भद्रावती :- 
                 स्थानिक सुमठाना येथील मल्हारी बाबा सोसायटी येथे बाल संस्कार शिबिर सुरू असून या शिबिरात 100 विद्यार्थी सहभागी झाले असून या शिबिराला येथील  इनरव्हील क्लब क्लब ने भेट देऊन सहभागी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वितरण करण्यात आले. 
सदर शिबिर सकाळी सहा वाजता पासून सुरू होत असून या शिबिरात योगा पासून तर लाठी- काठी, सांस्कृतिक कार्यक्रम तर दुपारी योग्य मार्गदर्शन, संस्काराचे आयोजन करण्यात येत असून हरिपाठ घेऊन दिवसाची सांगता करण्यात येते. इनरव्हीलच्या या वितरण समारंभाला सुनंदा खंडाळकर, वर्षा धानोरकर, वंदना धानोरकर, विश्रांती उराडे, तृप्ती हिरादेवे, विभा बेहरे ,कीर्ती गोहणे, शुभांगी बोरकुटे आदींचा सहभाग होता.


Comments