लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

TDRF कडून अहिल्याबाई होळकर वृद्धाश्रम, महिला आश्रम, अनाथाश्रम येथे जीवनाशक अन्नधान्य किटचे वाटप*वरोरा :

*TDRF कडून अहिल्याबाई होळकर वृद्धाश्रम, महिला आश्रम, अनाथाश्रम येथे जीवनाशक अन्नधान्य किटचे वाटप*
वरोरा : हरीश केशवानी 
आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्य करण्यासाठी अधिकृत व नोंदणीकृत असलेल्या टीडीआरएफला ९ मे रोजी १९ वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्य १ ते ९ मे दरम्यान  टीडीआरएफ वर्धापनदिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने ९ मे २०२३ रोजी वरोरा कंपनी च्या जवानांकडून कडून मा. टीडीआरएफ संचालक हरिश्चंद्र ब.राठोड व मा. TDRF मुख्य क्षेत्रीय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुस्कान ज. सैय्यद यांच्या मार्गदर्शनात वरोरा येथील अहिल्याबाई होळकर वृद्धाश्रम,महिला आश्रम, अनाथाश्रम येथे जीवनाशक अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. त्यामधे 20 किलो गहू, 25 किलो तांदूळ, 2 किलो मसूर दाळ, 5 कीलो साखर, 2 तेल पॉकेट इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले. 

वर्धापन दिन महोत्सवांर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी या आश्रमच्या संचालिका सोनू ताई येवले ही उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी टीडीआरएफ चे वरोरा कंपनीचे गणेश बुरांडे, हर्षाली मालेकर,आस्था मोगरे,रंजीत देवतळे,वेदांत थाटे,कुंदन साहू,सानिका सोनटक्के,आकांशा मांढरे,जानवी घोडमारे,तनुजा पायगन,प्राची उमटे, साक्षी उमटे,वैशाली काळे,मैथिली खानेकर,ऋतुजा उईके,हर्षदा मडावी,मनीषा गाडगे,शृतिजा लोखंडे,ऋतिका बाडबुद्धे,प्राची आत्राम,अश्विनी लाखे,प्रणाली गेडाम,प्रिया खंडाळकर,तनुषा आगलावे,श्रुती शेडमाके,सानिका देहारकर,सानिका जुनगरी,मानसी निब्रड,प्रणोती खैरे,अंशुल गाते,नैतिक दाते,मानस वाटकर,तन्मय चतुर,करण बोडे,वंश निकुरे,केदारनाथ हुलके,वेदांत हिवरकर,आयुष बावणे,कृष्णा दडमल,मोहित बावणे,साहिल मडावी,अजय मेश्राम,पवन वनकर,नैतिक रुयारकर,वैष्णवी बडबुद्धे,सृष्टी दडमल इत्यादि TDRF जवानांनी ने परिश्रम घेतले
-----------------------------------------------------------------------------------------------------------------

Comments