लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*वरोडा येथे स्वामींची पुण्यतिथी मोठया उत्साहात साजरी*

*वरोडा येथे स्वामींची पुण्यतिथी मोठया  उत्साहात साजरी*

वरोडा : शाम ठेंगडी वरोरा 

   येथील श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे 
राम मंदिरात  श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथीचा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.
   अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांचा निजानंद दिन (पुण्य तिथी) कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील चैत्र कृ. १३ दिनांक ६ मे रोज  सोमवार ला प्रगट रुपात संपन्न  झाला.

     सकाळी ७.३० वाजता पासून धार्मिक  कार्यक्रमाला प्रारंभ झाला असून सकाळी भूपाळीनंतर सर्व सेवेकरी यांचे सहभागाने श्री स्वामी समर्थ महाराज  यांचा महा अभिषेक करण्यात आला. यात जवळपास 15 जोडपे सहभागी झाले होते. यानंतर शहरातील उद्योजक आशिष ठाकरे व कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब भोयर यांच्या  हस्ते सपत्नीक महाआरती  पार पडली. त्यानंतर श्रीराम सत्संग महिला भजन मंडळाच्या महिला सदस्यांचे भजन झाले. 
    यानंतर दुपारी १२:०० वाजता अनेकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. सायंकाळी ६.३० वाजता श्रीराम देवस्थान कमिटीचे अध्यक्ष प्राध्यापक श्रीकांत पाटील यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले व शहरातील मार्गावरून पालखीची परिक्रमा काढण्यात आली. रात्रौ ९:०० वाजता श्री स्वामींची महा आरती  करण्यात आली. सम्पूर्ण कार्यक्रमात शहरातील अनेक भाविक भक्त बहुसंख्येने सहभागी झाले  होते.
   कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ सेवा केंद्राचे अध्यक्ष बाबा वाकडे व सचिव संदीप ठाकरे जगदीश तोटावर यांच्या नेतृत्वात अनेक सेविक-यांनी परिश्रम घेतले .

Comments