1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

*श्रुती अरविंद आसुटकर या विद्यार्थिनीने ९३.८०% गुण घेवून केले प्रावीण्य प्राप्त*

*श्रुती अरविंद आसुटकर या विद्यार्थिनीने ९३.८०% गुण घेवून केले प्रावीण्य प्राप्त*

अतुल कोल्हे भद्रावती : 

            आज लागलेल्या दहाव्या वर्गाच्या निकालात श्रुती अरविंद आसुटकर या विद्यार्थिनीने ९३.८०% गुण घेवून प्रावीण्य प्राप्त केले आहे. स्थानिक आयुध निर्माणी, चांदा येथे ती शिकत होती. तालुक्यातील पिरली या गावाची ती रहिवासी असून तिचे वडील शेतकरी आहे व साधारण कुटुंबातून व जेमतेम परिस्थितीवर मात करीत तिने हे प्रावीण्य प्राप्त केले आहे.

तिने तिच्या यशाचे श्रेय प्राचार्य, शिक्षक व आई वडिलांना दिले असून सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.

Comments