लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

भद्रावतीत लेदरबॉल क्रिकेट शिबिराला सुरुवात*

*भद्रावतीत लेदरबॉल क्रिकेट शिबिराला सुरुवात*

अतुल कोल्हे भद्रावती :-
              लक्ष फाउंडेशन भद्रावती तर्फे पिपराडे ग्राउंड भद्रावती (भद्रावती ग्रेनेड्स क्रिकेट क्लब भद्रावती)  तर्फे मुला मुलींचे लेदर बॉल क्रिकेट प्रशिक्षण शिबिर एक मे ते 15 मे च्या दरम्यान आयोजित करण्यात आलेले आहे. शिबिराचे उद्घाटन नुकतेच पार पडले. या प्रसंगी लक्ष फाउंडेशन चे संदीप शिंदे, नकुल शिंदे, सचिन सरपटवार, अफजल भाई,सुनील महाले, रोहन कुटेमाटे, चंद्रकांत खारकर, अविनाश पारोदे, प्रशिक्षक समीर बल्की, प्रदीप खंगार, सुहास वाढई ,विनायक माडोट कुंदन चौधरी, निखिल कुत्तरमारे,सुयोग बल्की हे उपस्थित होते. या शिबिराचे उद्घाटन  अफजल भाई यांच्या हस्ते पार पडले.30 प्रशिक्षणार्थ्यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला असून मुला मुलींचा यात सहभाग आहे.


Comments