वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

महाप्रसादातून अन्न विषबाधा : एकाचा मृत्यू*सौ.सपना मुनगंटीवार यांची वरोरा उपजिल्हा रुग्णालय येथे भेट. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात 65 रुग्ण दाखल. माजरी येथील युवकांची तात्काळ मदत मिळाल्याने रुग्णांचे प्राण वाचले.

*महाप्रसादातून अन्न विषबाधा : एकाचा मृत्यू*

सौ.सपना मुनगंटीवार  यांची वरोरा उपजिल्हा रुग्णालय येथे भेट
. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात 65 रुग्ण दाखल. 

  माजरी येथील युवकांची तात्काळ मदत मिळाल्याने रुग्णांचे प्राण वाचले.


वरोरा 
चेतन लुतडे वरोरा 

           माजरी येथील काली माता मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादातून शेकडो नागरिकांना अन्नविषबाधा  झाल्याची माहिती दिनांक 14 रोज रविवारला पहाटे तीन वाजता उघडकीस आली आहे.


 यात गुरुफेक राम यादव राहणार माजरी वय 80 वर्ष या वृद्धाचा मृत्यू झाला असून विषबाधा झालेल्या 232 रुग्णांना माजरी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय वरोरा व भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

वरोरा उपजिल्हा रुग्णालय येथे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्नी  सपना मुनगंटीवार व त्यांच्या कार्यकर्तानी  भेट देऊन रुग्णांची परिस्थिती जाणून घेतली.

सर्व दाखल रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रमुख डॉक्टर खूजे यांनी  आली आहे. चिंताजनक रुग्णांना चंद्रपूर येथे भरती करण्यात आले आहे. मांजरी येथील युवकांनी लगेच रुग्णांना वरोरा उप जिल्हा रुग्णालयात पोहोचवल्याने बरेच रुग्णांचे प्राण वाचवता आले. यासाठी स्वप्न मुनगंटीवार यांनी सिंग साहेब, औदेश राम, मनोज राम, संदीप सिंग, यांचे आभार व्यक्त केले. 
याबाबत कार्यक्रमाचे आयोजक बबलू राम यादव यांना चौकशीसाठी माजरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माजरी येथील न्यू हाउसिंग एरिया,  काली माता मंदिरात दिनांक 13 रोज शनिवारला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हा प्रकार कसा घडला याची खंत त्यांना आहे. बुंदीचा प्रसाद ज्यांनी खाल्ले होते त्यांना हा प्रकार सर्वात जास्त आढळल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
 महाप्रसादाचा लाभ घेणाऱ्या शेकडो नागरिकांना उलट्या, संडास व पोटदुखी रात्रीपासून सुरू झाल्याने त्यांना माजरी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. आज पहाटे चार वाजेपर्यंत 232 रुग्णांना माजरी, वरोरा व भद्रावती येथील आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या सर्वांना महाप्रसादातील भोजनातून अन्न विषबाधा झाली असल्याचा आरोग्य विभागाचा प्राथमिक अंदाज आहे.




Comments