वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

भद्रावती येथे श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराला सुरुवात**126 विद्यार्थ्यांचा सहभाग*

*भद्रावती येथे श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराला सुरुवात*

*126 विद्यार्थ्यांचा सहभाग*
 
अतुल कोल्हे भद्रावती :-
                 श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर समिती भद्रावतीच्या वतीने शहरातील भक्तनिवास परिसरात दिनांक 21 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराला सुरुवात करण्यात आली आहे. या शिबिरात 126 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. सदर शिबिरात विद्यार्थ्यांना प्रामुख्याने बौद्धिक, व्यायाम, संगीतष मलखांब, टाळ व पदन्यास, लाठीकाठी, कराटे, गायन, वादन, वक्तृत्व कला, श्रीमद्भागवत गीता, ग्रामगीता, थोर पुरुषांचे चरित्र, वक्तशीरपणा इत्यादी विषयांचे धडे देण्यात येत आहे.या शिबिराला श्री गुरुदेव प्रचार समिती गुरुकुंज, मोझरी येथील प्रशिक्षक प्रशिक्षण देत आहे. आजच्या विद्यार्थ्यावर सुसंस्कार व्हावे व ते एक सुसंस्कृत नागरिक घडावे यासाठी या शिबिराचे दरवर्षी आयोजन करण्यात येते.

Comments