गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा अभिनव उपक्रम.

गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा  अभिनव उपक्रम.  गणेश मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक बंडू देऊळकर व आपला दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने समाज उपयोगी उपक्रम. विराट गणेश मंडळाकडून मोफत हेल्थ चेकअपचा लाभ घेण्याचे आवाहन. वरोरा : गणेशोत्सवाच्या उत्साहाला समाजसेवेची जोड देत मोरया गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी चौक आणि शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र, टिळक वॉर्ड क्रमांक ३, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक २ मध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात एकूण १११ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ७० पुरुष आणि ४१ महिलांचा समावेश होता. नागरिकांची बीपी, शुगर तसेच आवश्यक रक्त तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर संबंधित नागरिकांना पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नियमित आरोग्य तपासणी करून आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. शिबिरासाठी डॉ. गोविंद सिंग, वैभव ठाकरे, ओम उगले, सेजल बोरकर (टेक्निकल लॅब), समृद्धी दडमल (टेक्निकल लॅब), महादेव क...

*वरोड्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ*

*वरोड्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ*
 वरोडा : श्याम ठेंगडी

      राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीमेचा शुभारंभ 3 मार्च रोज रविवारला येथील  उपजिल्हा रुग्णालय येथील प्रथम बूथ वर करण्यात आला. शहरातील सर्व केंद्रावर आज 2950 लाभार्थ्यांना पोलिओ डोस देण्यात आला.
           याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ.प्रफुल खुजे यांच्या हस्ते  रसिका सुनील गायकवाड नामक नऊ महिन्याच्या  मुलीला पल्स पोलिओ डोज पाजून राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

      वरोडा शहरांमध्ये ही मोहीम राबविण्यासाठी एकूण 32 बूथचे नियोजन करण्यात आले आहे . 0  ते  5 वर्ष    वर्षाखालील 3143 लाभार्थींना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले  होते. यापैकी 2950 लाभार्थ्यांना पोलिओ डोस देण्यात आला. या मोहिमेअंतर्गत  3 मार्चला सुटलेल्या लाभार्थ्यांना घरोघरी जाऊन पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे. ही मोहीम  5 मार्च ते 9 मार्च पर्यंत चालू राहणार आहे.घर भेटी देण्याकरिता 15 टीमचे नियोजन करण्यात आले आहे.जेणेकरून शहरातील एकही लाभार्थी पोलिओ डोस पासून वंचित राहणार नाही याबाबत खबरदारी घेण्यात येणार आहे. 
याप्रसंगी  वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विरुटकर ,परिसेविका सरस्वती कापटे, इंदिरा कोळपे, अधिपरिचारिका रुबीना खान व प्रियंका दांडेकर , आरोग्य सहाय्यक सतीश येडे, आरोग्य मित्र अमोल भोंग,आरोग्यसेवक देव जुलमे हे उपस्थित होते.

Comments