वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

भद्रावती बाजार समितीची कापूस व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई*

*भद्रावती बाजार समितीची कापूस व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई*

अतूल कोल्हे भद्रावती

               दिनांक 03 मार्च 2024 रोज रविवारला मोहनदास हनुमान ठाकरे राहणार चिरादेवी या शेतकऱ्यांनी आपला कापूस वसंता माणिक वंजारी रा. मेसा यांना विकत असताना शेतकऱ्यांच्या लक्षात आले की वजन काट्यामध्ये मध्ये फरक आहे. असे त्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना म्हटले. परंतु ते व्यापारी समजायला तयार नव्हते. त्यांनी तात्काळ कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावतीचे  सचिव श्री. नागेश पुनवटकर यांना भ्रमणध्वनीवरून माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ बाजार समितीचे निरीक्षक श्री. संजय शेंडे लिपिक श्री. विलास पालकर यांना बोलावून  श्री. मोहनदास हनुमान ठाकरे रा. चिरादेवी यांचे घरी जाऊन श्री. वसंता माणिक वंजारी रा. मेसा कापूस खरेदी करत असताना त्यांच्यावर बाजार समितीच्या नियमानुसार कायदेशीर कारवाई करून दंड, बाजार फी, सुपरव्हिजन फी, अशी एकून रक्कम  15000/- रुपये  वसूल करण्यात आले.  यापुढे   भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांनी खेडा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना आपला  कापूस व अन्य शेतमाल  विकू नये, शेतमाल खरेदी करताना आढळल्यास,  बाजार समितीच्या नियमानुसार व्यापाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल उपबाजार आवार चंदनखेडा, नंदोरी येथेच विकावा. असे आवाहन बाजार समितीचे सभापती श्री. भास्कर ताजणे, उपसभापती सौ.अश्लेषा भोयर  (जीवतोडे ) सचिव नागेश पुनवटकर व बाजार समितीचे सर्व संचालक यांनी केले आहे.

Comments