वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*सुवर्णकार सोनार समाजा तर्फे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची ७३८ वी पुण्यतिथी साजरी*

*सुवर्णकार सोनार समाजा तर्फे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची ७३८ वी पुण्यतिथी साजरी*

अतुल कोल्हे भद्रावती :-
            दिनांक १ मार्च २०२४ रोज शुक्रवार ला संत शिरोमणी नरहरी महाराज यांची ७३८ वी पुण्यतिथी भद्रावती शहरात मोठया उत्साहाने साजरी करण्यात आली.
                 या पुण्यतिथी सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयराव चित्रीव अध्यक्ष भद्रावती सुवर्णकार समाज तर उद्घाटक प्रफुल चावरे चं. जि. सोनार समाज बहुउद्देशिय संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष हे होते.
           या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कु.शिवानी पांढरे रिपोर्टर ABP माझा पुणे,  मयूर फटीक CA , अतुल नरुकर सेवा परीक्षा ॲड. प्राशिष ताठे, संदीप चावरे, विनोद पांढरे, सुमेध कासुलकर, सौ. वृषालीताई पांढरे, सौ मनिषताई ढोमने, सौ कल्पनाताई रोकडे, सुभाषराव रोकडे तसेच आशिष यमनुरवर  हे होते. या वेळी मार्गदर्शन करताना प्रफुल चावरे तसेच मयूर फटीक, अतुल नरूकर, कु. शिवानी पांढरे यांनी युवकांना आपले कार्यक्षेत्रात कश्या प्रकारे प्रावीण्य करावे व समाजासाठी आम्ही सदैव पाठीशी राहु याची माहिती दिली.
          या कार्यक्रमात प्रशिष ताठे, कासुलकर, विनोद पांढरे, सौ. रोकडे, व सौ. ढोंमने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अध्यक्षीय भाषण विजयराव चित्रीव यांनी केले. प्रास्ताविक उमाकांत कुर्वे व आभार प्रदर्शन मोहन पांढरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ.स्नेहल कुर्वे व किशोर पांढरे यांनी केले.
              या पुण्यतिथी सोहळ्यातनसमाजातील ७५ वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा शाल देवून तसेच  गुणवंतांचा सत्कार सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला.
शहर व तालुक्यातील सर्व छोट्यां पासून तर वृद्धांपर्यंत समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येनी उपस्थिती होते.
यानंतर लहान मुलं, युवक, युवती तसेच महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले यासाठी सर्व समाजातील बांधवांनी उत्तम सहकार्य केले
यानंतर स्नेह भोजनाने कार्यक्रामाची सांगता करण्यात आले.
कार्यक्रमा करिता चंद्रपूर येथिल समाज बांधवांनी उपस्थिती दिली.
या कार्यक्रमाचे यशस्वितेकरिता  सुवर्णकार समाज कार्यकारिणी, नरहरी सेना,महिला कार्यकारिणी यांनी अथक परिश्रम घेतले.

Comments