वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

चंद्रपूर महामार्ग पोलीस विभागाच्या बदल्यानवीन पोलीस अंमदार रुजू.

चंद्रपूर महामार्ग पोलीस विभागाच्या बदल्या

नवीन पोलीस अंमदार रुजू.

वरोरा 14/feb/24
चेतन लुतडे

महामार्ग पोलीस विभाग चंद्रपुर येथे कार्यरत असलेला महामार्ग पोलीस अंमलदारांचा कालावधी संपल्याने त्यांना महामार्ग पोलीस विभाग चंद्रपुर येथुन पोलीस मुख्यालय, चंद्रपुर येथे बदलीवर कार्यमुक्त करण्यात आले आहे.

तसेच दिनांक १३/०२/२०२४ रोजी महामार्ग पोलीस विभाग चंद्रपुर येथे एकुण ३३ पोलीस अंमलदारांचा नविन पोलीस स्टॉफ कर्तव्यावर हजर झाले आहे.

Comments