वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*माणुसकीला काळीमा फासणारी घटना**सख्या बापानेच केला पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार**सतत तीन वर्षांपासून पोटच्या मुलीवर चालु होता लैंगिक अत्याचार : नराधम आरोपी बापास अटक*

*माणुसकीला काळीमा फासणारी घटना*

*सख्या बापानेच केला पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार*

*सतत तीन वर्षांपासून पोटच्या मुलीवर चालु होता लैंगिक अत्याचार : नराधम आरोपी बापास अटक*
 
अतुल कोल्हे भद्रावती :
              सतत तीन वर्षांपासून आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका 55 वर्षीय नराधम आरोपी बापास भद्रावती पोलिसांनी दिनांक 9 फेब्रुवारी रोज शुक्रवारला सकाळी 8.00 वाजता पासको कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून अटक केली आहे. 
              माणुसकीला काळीमा फासणारी सदर घटना शहरातील एका भागात घडली. शहरातील एका भागात राहणाऱ्या या आरोपीची पत्नी ही त्याच्यापासून वेगळी राहते. मात्र मुलगी ही बापाजवळ राहत होती. सदर नराधम बाप हा आपल्या पोटच्या मुलीवर 2021 पासून लैंगिक अत्याचार करीत होता. या प्रकाराची माहिती सदर मुलीने आपल्या आईला सांगितल्यानंतर आईने सदर मुलीसह भद्रावती पोलीस स्टेशन गाठले. त्यानंतर आईच्या समक्ष मुलीने भद्रावती पोलिसात या घटनेची तक्रार केली. त्यानंतर भद्रावती पोलिसांनी सदर आरोपीस अटक केली. सदर घटनेचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी नयोमी साटम यांच्या नेतृत्वात भद्रावती पोलीस करीत आहे.


Comments