1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्रात रवींद्र शिंदे यांचा अनोखा उपक्रम शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडी तर्फे गावोगावी हळदीकुंकु व वाणवाटपाचा अभिनव उपक्रमा द्वारे जनजागृती अभियान.विधानसभा क्षेत्रात उदंड प्रतिसाद

भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्रात रवींद्र शिंदे यांचा अनोखा उपक्रम

 शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडी तर्फे गावोगावी हळदीकुंकु व वाणवाटपाचा अभिनव उपक्रमा द्वारे जनजागृती अभियान.

विधानसभा क्षेत्रात उदंड प्रतिसाद

भद्रावती : चेतन लुतडे

वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात दिनांक 25 जाने. ते 8 फेब्रु. पर्यंत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) तर्फे महिलांकरीता हळदी-कुंकु, वाण तसेच महिला स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याच श्रृंखलेतील नववा कार्यक्रम भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथे आज (दि. 01) ला घोडपेठ-कोंढा जिल्हा परीषद क्षेत्रातील महिला तसेच विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमास जिल्हा परीषद क्षेत्रातील घोडपेठ, चालबर्डी, कचराळा, चपराळा, गुंजाळा, घोट निंबाळा, गोरजा, मोहबाळा, कवठी, तिरवंजा, सायवान येथील महिला मोठया संख्येने सहभाग नोंदविला.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, शिवसेना नेत्या रश्मीताई ठाकरे यांच्यासूचनेनुसार, शिवसेना नेते पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनातून, चंद्रपुर-आर्णी लोकसभा निरिक्षक तथा माजी नगरसेवक शिवसेना उपनेते मनोज जामसुतकर यांचे निरीक्षणात, पुर्व विदर्भ सघंटीका तथा प्रवक्ता प्रा. शिल्पा बोडखे यांच्या संकल्पनेतून, जिल्हा महिला संघटीका नर्मदा बोरेकर यांच्या पुढाकाराने, पूर्व विदर्भ सचिव नीलेश बेलखेड़े, वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, उपजिल्हाप्रमुख तथा भद्रावती कृ.उ.बा.स. सभापती भास्कर ताजने यांच्या नेतृत्वात, विधानसभा समन्वयक वैभव डहाणे, विधानसभा संघटक मंगेश भोयर, युवासेना जिल्हा अधिकारी रोहण कुटेमाटे, युवती सेनेच्या जिल्हा अधिकारी प्रतिभा मांडवकर, विधानसभा युवा अधिकारी अभिजित कुडे यांचे सहभागाने वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन 80% समाजकारण व 20%  राजकारण या भूमिकेतून चंद्रपूर जिल्ह्यातील 75, वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्नेहसंमेलन सोहळा व मकर संक्रांतीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत सामाजिक सौहार्द व एकोपा नांदत राहावा व चांगल्या विचाराचे आदान प्रदान व्हावे या हेतूने हळदीकुंकू वाण वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटक शिवसेना विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी केले तसेच महिला आघाडी जिल्हा संघटीका नर्मदा बोरेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षा तसेच मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करीत महापुरुषांना माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमास मंचावर भद्रावती कृउबास सभापती तथा उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजणे, भद्रावती तालुका प्रमुख नरेंद्र पढाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंचावर उपस्थित मान्यवरांसोबतच प्रमुख पाहुणे युवती जिल्हा अधिकारी प्रतिभा मांडवकर, माजी नगरसेविका सुषमाताई शिंदे, प.स. भद्रावती माजी सदस्या अश्विनी ताजणे, भद्रावती कृ.उ.बा.स. उपसभापती तथा युवतीसेना जिल्हा समन्वयक अश्लेषा जिवतोडे-भोयर, ग्रा.प. कचराळा सरपंचा सिमा कुळमेथे, गुंजाळा सरपंचा प्रिती कोवे, उपसरपंच माया सावरकर, सदस्या माधुरी आवारी तथा शारदा उपरे, कचराळा उपसरपंच छत्रपती एकरे यांनी मार्गदशन केले.
कार्यक्रमास युवासेना जिल्हा अधिकारी रोहन कुटेमाटे, भद्रावती कृउबास संचालक परमेश्वर ताजणे हे प्रमुख पाहुणे तथा सुनिल चौधरी, सुधीर राऊत, प्रमोद येसेकर, विवेक राऊत, सचिन फटाले, सनाबाई गणफाडे, सुमित्रा सुर, विमल फटाले, उज्वला राऊत, सरोज रामटेके, कविता राऊत, तानेबाई परचाके, अरुणा वर्मा, अर्चना साव, सोनाबाई तांदुळकर, विमल निमकर, रेशमा विधाते, सुनिता येसेकर, शिला चौधरी सोबतच डॉ. खंगार, संदीप सुर, धनराज गणफाडे, भाऊराव वनकर, सुनिल चौधरी, प्रमोद येसेकर, गौरव पाटील, विलास मिलमिले, गुणवंत भेउेकर, आशीष्ज्ञ मिश्रा, अविनाश भगत, गणेश घोरपडे तसेच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, गणमाण्य प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वी करण्याकरीता भद्रावती महिला आघाडी तसेच भद्रावती कृउबास संचालक विनोद घुगुल, महिला आघाडी पदाधिकारी भावना खोब्रागडे तसेच युवतीसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोलाचे सहकार्य केले.
प्रास्ताविक भद्रावती तालुका प्रमुख नरेन्द्र पढाल यांनी तसेच कार्यक्रमाचे संचालन युवतीसेना जिल्हा अधिकारी प्रतिभा माडंवकर तथा आभार प्रदर्शन तालुका संघटीका आशा ताजणे यांनी केले. हर्षोल्लासात घोडपेठ येथे हळदी-कुंकु, वाण वाटप व स्नेहमिलन सोहळा सफलतापुर्वक महिलांचा उपस्थितीत संपन्न झाले.

Comments