वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

भद्रावती तालुक्यात इतिहास घडणार : तब्बल त्रेचाळीस वर्षानंतर वर्ग १० वी चे वर्गमित्र येणार सहकुटूंब एकत्रीत*

*भद्रावती तालुक्यात इतिहास घडणार : तब्बल त्रेचाळीस वर्षानंतर वर्ग १० वी चे वर्गमित्र येणार सहकुटूंब एकत्रीत* 

 *जेना येथे माजी विद्यार्थांचा स्नेह मिलन सोहळा*

*बैठकीत उपस्थित १०वी चे वर्गमित्र*

अतुल कोल्हे भद्रावती :-
                तालुक्यातील जेना  येथील कर्मवीर विद्यालयात दि. २ फेब्रुवारी २०२४ रोज शुक्रवारला अकरा वाजता माजी विद्यार्थांचा स्नेह मिलन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त याच विद्यालयात शैक्षणिक सत्र १९७९-८० मध्ये वर्ग १० मध्ये शिक्षण घेतलेले सर्व वर्गमित्र  तब्बल त्रेचाळीस वर्षा नंतर सहकुटूंब एकत्रीत येणार आहे. हा स्नेह मिलन सोहळा भद्रावती तालुक्यात एक इतिहास घडविणार असल्याचे या निमित्य बोलल्या जात आहे.
    दि. २९ जानेवारी २०२४ रोज सोमवारला सदर मेळावा आयोजनासंबधी स्धानिक रहिवासी अशोक देहारकर यांच्या घरी नुकतीच अंतीम आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विजय दोडके उपस्थित होते. याप्रसंगी प्रभाकर वाघ, अशोक देहारकर,सुर्यभान पिंपळकर, राजेंद्र मोदी, भाऊराव ठेंगणे, सुधाकर बोढाले, उत्तम शिरपूरकर, नंदकुमार कायरकर, शामराव कायरकर , पोमेश्वर टोंगे आणि आशिष देहारकर प्रामुख्याने उपस्थित होते. या सभेचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सुर्यभान पिंपळकर यांनी केले.
      दि. २ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या माजी विद्यार्थी स्नेह मिलन सोहळ्यात वर्ग १०वी शैक्षणिक सत्र १९७९-८० च्या बॅचचे तत्कालीन गुरुवर्य पुंडलीक नन्नावरे, विठ्ठल रोडे आणि मारोतराव खिरटकर यांचा सत्कार करण्यात येईल. या निमित्याने शैक्षणिक  रॅली, माजी विद्यार्थांसाठी तासीका, मान्यवरांचे मार्गदर्शन , माजी विद्यार्थांचे मनोगत आणि तत्कालीन गुरुवर्य आणि माजी विद्यार्थी यांचा  सुसंवाद आदि उपक्रम राबविण्यात येणार आहे.
  या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यीक तथा राज्य पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक ना.गो. थुटे,  उद्घाटक  ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय देवतळे आणि मुख्य मार्गदर्शक म्हणून वरोरा येथील  आनंद निकेतन महाविद्यालयाचे सेवानिवृत्त मराठी विभाग प्रमुख प्रा. श्रीकांत पाटील यांच्यासह अन्य आतिथी वृन्द उपस्थित राहतील.

Comments