वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

चिचोर्डी शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुद्ध पाणी**शिवसेने तर्फे आरो भेट : विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शुद्ध पाणी महत्त्वाचे*

*चिचोर्डी शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुद्ध पाणी*

*शिवसेने तर्फे आरो भेट : विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शुद्ध पाणी महत्त्वाचे*

अतुल कोल्हे भद्रावती :- 
                 शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिचोर्डी येथे विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे याकरीता शिवसेना ( उभाठा ) च्या वतीने आरो भेट देण्यात आला. प्राथमिक शाळेत एक ते सात पर्यंत ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेत आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्यासाठी शुद्ध पाणी हे महत्त्वाचे असते याकरीता शिवसेना ( उभाठा ) वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिचोर्डीला आरो भेट देण्यात आला. यावेळी ठाणेदार बिपिन इंगळे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख महेश जीवतोडे, मुख्याध्यापक नगराळे, मंगेश शिरसागर, मिलिंद कांबळे, महादेव बांगडे आदी उपस्थित होते.

Comments