वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

शेगावात चिमूर वरोरा राष्टीय माहामार्ग चे काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलनसुमारे २ तास होती दोन्ही बाजूची वाहतुक ठप्पराष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अभियंता बोबडे यांचे लेखी आश्वाषणा नंतर आंदोलन मागे

शेगावात चिमूर वरोरा राष्टीय माहामार्ग चे काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन

सुमारे २ तास होती दोन्ही बाजूची वाहतुक ठप्प
राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अभियंता बोबडे यांचे लेखी आश्वाषणा नंतर आंदोलन मागे
वरोरा :- वरोरा तालुक्यातील शेगाव बु येथे आज दि. १३ डिसेंबर ला बस्थानक शेगाव बु येथे चिमूर वरोरा महामार्ग ३५३ ई चे मागील ७/८ वर्षां पासून अर्धवट काम त्वरित पूर्ण करण्याच्या मागणीसाठी सकाळी १० वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आले.   
या रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे कित्तेकांना आपला जिव गमवावा लागला आहे. तर काहींना कायमचे अपंगत्व आले असून मागील २ महिन्या पासून रस्त्याचे काम करणाऱ्या एस. आर. के. कंपनी चे पूर्ण काम बंद केले आहे. त्यामुळे स्थानिक जनतेला, प्रवाशांना, ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे याच्या विरोधात हे आंदोलन शेगाव मधील नागरिक आणि परिसरातील त्रस्त नागरिक यांनी आयोजित केले होते. सुमारे २ तास वाहतूक ठप्प झाली होती आंदोलन पूर्ण होत पर्यंत शेगाव मधील संपूर्ण व्यापारी मंडळींनी स्वयंस्पुर्तीने आपली दुकानें बंद ठेऊन आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला.  नंतर स्थानिक पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांचे माध्यस्थीने राष्ट्रीय माहामार्ग चे उपविभागीय अभियंता बोबडे यांचे लेखी आश्वाषणा नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

  यात अभियंता बोबडे यांनी येत्या आठ दिवसात कामाला रस्त्याच्या कामावर नवीन कंपनीची नियुक्ती करुन येत्या मे महिन्याच्या शेवट पर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्यात येईल.
शेगाव मध्ये उडणाऱ्या धुळी साठी रोज रस्त्यावर पाणी मारण्यात येईल.
व भेंडाला जवळ रस्त्याच्या मधात गरज नसताना उभी असलेली मशीन लवकरात लवकर रस्त्याच्या बाजूला हटवण्यात येईल अशा स्वरूपाचे लेखी अशासान दिले.
या आंदोलनात शेगाव येथील नागरिक, परिसरातील नागरिक, विद्यार्थी, व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

Comments