वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रयत्नांना यश**वरोरा तालुक्यातील महत्वाच्या रस्त्याला २६४.५३ कोटी मंजूर*

*आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रयत्नांना यश*

*वरोरा तालुक्यातील महत्वाच्या रस्त्याला २६४.५३ कोटी मंजूर*


चंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील कोसार - सोईत - मुधोली - वरोरा पवना - वेळगाव - चंदनखेडा - मोहुर्ली रामा - ३७१ किमी ७/१५५ ते ४०/२०५ (एकूण लांबी = ३३.७० ) रस्त्याची सुधारणा करणे (भाग - कोसरा - वरोरा - पावना) या रस्त्याला आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पाठपुराव्याने एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB ) अंतर्गत २६४.५३ करोड रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी, व्यापारी  वर्गासाठी, ग्रामस्थांनी तसेच विद्यार्थ्यांसाठी मोठा प्रश्न मार्गी लागला आहे.

या रस्त्याची लांबी ३३.७० किलोमीटर आहे. हा रस्ता वरोरा तालुक्यातील कोसार, सोईत, मुधोली, वरोरा पवना, वेळगाव, चंदनखेडा, मोहुर्ली  या गावांमधून जातो. हा रस्ता अतिशय खराब अवस्थेत होता. या रस्त्यावरून वाहतूक करणे कठीण होते. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांपासून ते व्यापारी वर्गापर्यंत अनेकांची  होती. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील व ताडोबा जाणाऱ्या प्रवाशांना या मार्गामुळे प्रवास करणे सुलभ होणार आहे. 

या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी तत्कालीन दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्यासोबत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनीही हा प्रश्न लावून धरला होता. 

या रस्त्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. त्यानंतर आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सुद्धा हा प्रश्न लावून धरला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून या रस्त्याला ADB अंतर्गत २६४.५३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

या रस्त्याची दुरुस्ती झाल्यानंतर वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना, व्यापारी वर्गाला तसेच विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. या रस्त्यावरून वाहतूक करणे सोपे होईल. त्यामुळे या परिसरातील विकासाला चालना मिळेल.

Comments