वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

वरोरा येथे राष्ट्रीय स्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन* *वरोरा शहरात येतील देशभरातील एका पेक्षा एक डान्सर* *एकूण ७ लाख ७० हजाराचे रोख पारितोषिक*

*वरोरा येथे राष्ट्रीय स्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन* 

*वरोरा शहरात येतील देशभरातील एका पेक्षा एक डान्सर* 

*एकूण  ७ लाख ७० हजाराचे रोख पारितोषिक* 

*वरोरा :-* हॉटेल ग्रीन वे व बाबुलाल आईस्क्रीम आयोजित राजवारसा  प्रॉडक्शन प्रस्तुत बुगी उगी २०२३ या भारतातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय स्तरीय नृत्य स्पर्धेचे येत्या १५ डिसेंबर ते १७ डिसेंबर दरम्यान स्थानिक आलिशान ग्राउंड वर आयोजन करण्यात आले आहे . 

डिसेंबर महिना नृत्य रसिकांसाठी जणू मेजवानीच ठरणार आहे. वरोरा शहरात पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून . यात *ग्रुप डान्स (समूह नृत्य )* करीत प्रथम पारितोषिक १ लाख ५० हजार , द्वितीय १ लाख , तृतीय ५० , हजार , चतुर्थ  पारितोषिक २० हजार रुपये पंचम  पारितोषिक १० हजार .*सोलो डान्स (एकल नृत्य)*   करीता प्रथम १ लाख , द्वितीय  ५० , हजार ,  तृतीय  पारितोषिक २० हजार रुपये चतुर्थ पारितोषिक १० हजार .पंचम ५ हजार  , *डूयत (युगल डान्स )* 
 करीता प्रथम८० हजार  , द्वितीय  ५० , हजार ,  तृतीय  पारितोषिक २० हजार रुपये चतुर्थ पारितोषिक १० हजार .पंचम ५ हजार , किड्स डान्स *(लहान मुलांचे नृत्य)* प्रथम ५० हजार  , द्वितीय  20  हजार ,  तृतीय  पारितोषिक १०  हजार रुपये चतुर्थ पारितोषिक 7 हजार .पंचम ३ हजार  असे एकूण चार गटात स्पर्धेची विभागणी करण्यात आली आहे . त्याच सोबत स्पर्धेत सभागी स्पार्धकांना स्मृतिचिन्ह व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार तसेच या स्पर्धकांमधून बेस्ट वरोरा , बेस्ट चंद्रपूर , बेस्ट विदर्भ , बेस्ट महाराष्ट्र डान्सर निवडण्यात येणार आहे . त्यांना ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात येणार आहे . विशेष म्हणजे या स्पर्धेत उत्कृष्ट डान्स करणाऱ्या विजेत्या डान्सर ला राजवारसा प्रॉडक्शन निर्मित पुढील चित्रपटामध्ये नृत्याची तसेच अभिनयाची संधी मिळणार आहे .

 या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे तसेच या स्पर्धे करिता  देशातील विविध राज्यातून एका पेक्षा एक डान्सर सहभागी होणार असून या ऐतिहासिक नृत्य स्पर्धेचे वरोरा करांनी साक्षदार व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे . हि स्पर्धा पासेस व तिकीट काढून बघता येणार असून याची अडवान्स बुकिंग सुरु झालेली असल्याची माहिती हि आयोजकांनी दिली . अधिक माहिती करिता आपण हॉटेल ग्रीन वे चे संचालक शुभम चिमुरकर व बाबुलाल आईस्क्रीम चे संचालक नीरज चौधरी यांच्याशी संपर्क साधवा असे हि आयोजकांनी सांगितले आहे .

Comments