लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोऱ्यातील बनावट मद्य तस्कर अखेर जेरबंद*

*वरोऱ्यातील बनावट मद्य तस्कर अखेर जेरबंद*

वरोरा
28/11/23

निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभाग वरोरा यांचे कारवाईत वरोऱ्यातील बनावट मद्य तस्कर आरोपी नामे १) अनिलसिंग अजबसिंग जुनी उर्फ पिंटू सरदार व २) आशिष पुरुषोत्तम मडावी यास जेरबंद करण्यास अखेर राज्य उत्पादन शुल्क, विभागास यश आले आहे. गुप्त बातमीदाराने खात्रीदायक माहिती दिल्यावरून दि. २४/११/२०२३ रोजी पहाटेच्या वेळी आनंदवन चौक, वरोरा येथे वरील आरोपीस वाहनासह ताब्यात घेण्यात आले. आरोपीच्या ताब्यातून ९० मिली च्या ६०० देशीमद्याच्या बनावट बाटल्या असा असा एकूण रु. १,१६,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाई मुळे वरोरा तालुक्यातील बनावट देशीमद्याची विक्री करणारा मुख्य सूत्रधार पकडला गेला आहे. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन मा. न्यायालयात हजर केले असता आरोपीस पुढील तपासासाठी ०३ दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
सदर कारवाई ही श्री. अनिल चासकर, विभागीय उपआयुक्त, रा. उ. शु., नागपूर विभाग, श्री. संजय पाटील, अधीक्षक, रा. उ. शु., चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विकास बी. थोरात, निरीक्षक, रा. उ. शु., वरोरा, श्री. सचिन एच. पोलेवार, दु. निरीक्षक, श्री. भगीरत कुडमेथे, स. दु. निरीक्षक, श्री. जगदीश मस्के, जवान, श्री. जितेंद्र आनंद, जवान, व श्री. विलास महाकुलकर, जवान-नि-वाहनचालक यांनी पार पाडली.
सदरील गुन्ह्याचा पुढील तपास श्री. सचिन एच. पोलेवार, दु. निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, वरोरा हे करीत आहेत.

Comments