वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

२६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान आणि मृत्यूमुखी नागरिकांना श्रध्दांजली*

*२६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान आणि मृत्यूमुखी नागरिकांना श्रध्दांजली* 


२६ नोव्हेंबर २००८चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. 

या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद, व माजीसैनिक संघटना वरोरा,  यांचेकडून, शहीद स्मारक परिसर वरोरा इथे सामूहिक श्रध्दांजली देण्यात आली.

सर्व प्रथम आँननरी कॅप्टन मा. वामन निबृड आणि प्रतिष्ठीत नागरिक श्री अमन मोरेश्वर टेमूर्डे यांनी शहिद स्मारकवर पुस्पचक्र वाहून मानवंदना दिली आणि एअर व्हेटरन डी एन खापने यांच्या नेतृत्वात उपस्थित माजीसैनिक रमेश आवारी .सागर कोहळे. वसंतराव काकडे. देवराव राऊत. गजानन उपरे. सुरेश बोभाटे .ऋषी मडावी. रुपेश कुतरमारे.दौलत ढोके. प्रकाश चिकटे. गणेश धोबे.गणेश मडावी. योगेश ठेंगणे.यांनी सामुदायिकपणे श्रध्दांजली अर्पण केली. 

Comments