लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

हंसराज अहीर यांच्या नेतृत्वात महाजनसंपर्क अंतर्गत टेकामांडवा, शेणगांव व अन्य गांवात 'घर चलो अभियान'*

*हंसराज अहीर यांच्या नेतृत्वात महाजनसंपर्क अंतर्गत टेकामांडवा, शेणगांव व अन्य गांवात 'घर चलो अभियान'*

 राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या नेतृत्वामध्ये जिवती तालुक्यातील टेकामांडवा, शेणगांव, पाटन व नानकपठार, हिमायत नगर येथे माजी आमदारद्वय अॅड. संजय धोटे, सुदर्शन निमकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहभागातून सर्वसमावेशक 'घर चलो अभियान' राबविण्यात आले.

या महाजनसंपर्क अभियानामध्ये भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजू घरोटे जिवती पं.स. चे माजी उपसभापती महेश देवकते, गिरमाजी, सुरेश केंद्रे, शिवाजी सेलोकर, कोरपना तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, अरूण मडावी, डॉ. येरमे, रमेश आडे, भूते पाटील, प्रतिक सादनपवार, तुकाराम वारूलवाड, संदिप शेरकी, रामसेवक मोरे, शिवाजी पल्लेवाड, अनिल येले, अजिम, अनंता बावळे, मनोज तुमराम, तिरूपती कन्नाके, सरपंच विनोद जुमनाके, प्रमोद कोडापे, भिमराव पवार, खंदारे यांची उपस्थिती होती. यावेळी हंसराज अहीर व अन्य नेते, पदाधिकारी यांनी नागरिकांना केंद्रसरकारच्या कल्याणकारी योजनांची पत्रके वितरीत केले. केंद्र सरकारच्या 9 वर्षातील लोकाभिमुख कार्याची माहीती दिली. सेवा, सुशासन व गरीब कल्याण वर्षाबाबत लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. सरल ऍप, नमो ऍप, फ्रेन्डस ऑफ बीजेपी आणि केंद्र सरकारच्या हेल्पलाईन क्रमांकावर मिस कॉल करून भाजपाला समर्थन देण्याचे आवाहन भाजप नेत्यांनी या अभियाना अंतर्गत केले.
या कार्यक्रमाच्या अनुशंगाने हंसराज अहीर यांनी कोरपना तालुक्यातील चिंचोली (बेलगांव) येथे हितेश चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित आरोग्य व रक्तदान शिबीरास भेट देवून या कार्यक्रमाची प्रशंसा केली. येथील आरओ प्लांटचे लोकार्पण केले. या घरचलो अभियानादरम्यान हंसराज अहीर यांनी आदर्श शेतकरी रामसेवक मोरे, युवा उद्योजक निलेश ताजणे तसेच एव्हरेस्ट शिखर गाठणाऱ्या युवकाचा सत्कार केला. चिखली या गांवातील महादेव कोळी समाजातील बांधवांचे निवेदन स्विकारले नगराळा येथे अनेक महिला व युवकांनी हंसराज अहीर व अन्य नेते मंडळींच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.

Comments