वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*बोर्डा ग्रामपंचायत सदस्य उमेश देशमुख यांच्या नेतृत्वात युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश* *आमदार प्रतिभाताई धानोरकर उपस्थित प्रवेश*

*बोर्डा ग्रामपंचायत सदस्य उमेश देशमुख यांच्या नेतृत्वात युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश*

 *आमदार प्रतिभाताई धानोरकर उपस्थित प्रवेश* 

वरोरा : फुले - शाहू- डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या विचाराने प्रेरित झालेले उमेश देशमुख वरोरा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या बोर्डा ग्रामपंचायतचे गेल्या अडीच वर्षापासून कुठल्याही पक्षाशी बांधील न राहता सदस्यत्व पद भूषवित आहे. परंतु काँग्रेस पक्षाच्या विद्यमान आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या विकास कार्याचा धडाका पाहता त्यांच्या कार्याने प्रभावित होत काँग्रेस पक्ष बळकटी करण्यासाठी तसेच आमदार महोदय धानोरकर यांचे हात बळकट करून गावाचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य उमेश देशमुख यांच्या नेतृत्वात शेकडो सुशिक्षित युवकांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 

 यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत ताजने अर्चित गलांडे, प्रेषित तेलंग, मधुकर वाढई, सचिन कडवे, मंगेश चेंदे, उमेश काकडे, दीपक वरुडकर, तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला. 

याप्रसंगी बोर्ड ग्रामपंचायतच्या सरपंच्या ऐश्वर्या खामनकर, युवक काँग्रेस प्रदेश प्रवक्ते अमर भाई गोंडाने, ग्रामपंचायत सदस्य रविंद्र बगडे, प्रतिमा कातकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजुभाऊ चिकटे, राहुल नन्नावरे, शरद आसुटकर, प्रदीप उरकुडे  तसेच भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल भाऊ चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.

Comments