वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

स्वातंत्र्य दिनी शिवसेना शहर वरोरा यांचे तर्फे शंभर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप*

*स्वातंत्र्य दिनी शिवसेना शहर वरोरा यांचे तर्फे शंभर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप*

चेतन लूतडे, वरोरा 

*स्वातंत्र्य दिनाच्या शुभ पर्वावर शिवसेना शहर शाखा वरोरा तर्फे शिवसेना जिल्हाप्रमुख श्री नितीन मते यांच्या मुख्य उपस्थितीत आदर्श बहुउद्देशीय संस्था वरोरा द्वारा संचालित परिवर्तन मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह वरोरा येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले .श्री राजेश भाऊ डांगे शिवसेना शहर प्रमुख वरोरा हे नेहमीच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, खेळाचे साहित्य असे अनेक नानाविध सामाजिक उपक्रम राबवीत असतात . त्याचाच एक भाग म्हणून आज शिवसेना शहर शाखा वरोरा तर्फे परिवर्तन मागासवर्गीय वसतिगृह वरोरा येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप केले . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बंडूभाऊ लभाने, प्रमुख पाहुणे श्री नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर, शिवसेना शहर प्रमुख वरोरा श्री राजेश भाऊ डांगे,श्री वैभव जी पावडे, वस्तीगृहाचे मुख्य कार्यवाहक श्री बडवाईक सर, पोपटकर मॅडम, अँड. हिवरकर,  अँड.नकवे, अँड. साळवे, डॉ. धांडे, डॉ पिसे, प्रदिप लभाने ववसतीगृहाचा कर्मचारी वर्ग शालेय विद्यार्थी वसतिगृहाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते*

Comments