गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा अभिनव उपक्रम.

गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा  अभिनव उपक्रम.  गणेश मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक बंडू देऊळकर व आपला दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने समाज उपयोगी उपक्रम. विराट गणेश मंडळाकडून मोफत हेल्थ चेकअपचा लाभ घेण्याचे आवाहन. वरोरा : गणेशोत्सवाच्या उत्साहाला समाजसेवेची जोड देत मोरया गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी चौक आणि शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र, टिळक वॉर्ड क्रमांक ३, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक २ मध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात एकूण १११ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ७० पुरुष आणि ४१ महिलांचा समावेश होता. नागरिकांची बीपी, शुगर तसेच आवश्यक रक्त तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर संबंधित नागरिकांना पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नियमित आरोग्य तपासणी करून आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. शिबिरासाठी डॉ. गोविंद सिंग, वैभव ठाकरे, ओम उगले, सेजल बोरकर (टेक्निकल लॅब), समृद्धी दडमल (टेक्निकल लॅब), महादेव क...

प्रभारी वरोरा ठाणेदार यांचा अवैध दारू तस्करी करणाऱ्या टोळीला जबरदस्त दणका.

प्रभारी वरोरा ठाणेदार यांचा अवैध दारू तस्करी करणाऱ्या टोळीला जबरदस्त दणका.

रांजणकर यांच्या नियुक्तने अवैध व्यवसाय करणाऱ्या टोळींचे धाबे दणाणले.

चेतन लूतडे वरोरा
18जूलै23

वरोरा शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यानंतर वरोरा ठाणेदार म्हणून नुकतेच प्रभारी योगेश रांजणकर यांची नियुक्ती झाल्यापासून अवैध व्यवसाय करणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले आहे. गुटखा व्यवसाय, अवैध दारू व्यवसाय, रेती तस्करी, कोळसा तस्करी, चोरी प्रकरणे अशा अनेक गुन्हे ते निकालीस काढत आहे. त्यामुळे सामान्य जनतेचे आवाज बनले असून वरोरा करांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे.

 वरोरा पोलीस स्टेशन  अंतर्गत दी 17/07/23 रात्री अवैध दारू वाहतुकीवर कारवाई करण्यात आलेली आहे.सदर कारवाई खांबाड्या जवळ करण्यात आलेली आहे. चार चाकी मालवाहू गाडीमध्ये 40 पेट्या एकूण  नग 400अवैध दारू  जप्त करण्यात आलेली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण मुद्देमाल किंमत ₹6 लाख रुपये जप्त केले आहे. या गुन्ह्यामध्ये आरोपी नामे
1. अमोल चौधरी
2. पवन भोयर  
3. हर्षल खंगार यांवर मदका अंतर्गत कलम 83 व 65(A) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 
पुढील कारवाई वरोरा पोलीस करीत असून ही दारू कुठून आणली आणि कोणत्या मालकाकडे घेऊन जात होते. दारूवर कोणाचे बॅच नंबर आहे. याचाही शोध घेणे सुरू आहे.

अशाच पद्धतीची अवैध दारू अनेक खेड्या गावांमध्ये पोहोचत असून एक्साईज अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

सदर कार्यवाही मा श्री.रवींद्रसिंग परदेशी सर पोलीस अधीक्षक चंद्रपूर ,मा. रीना जनबंधू मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर , मा.श्री आयुष नोपाणी सर ASP वरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली परि पो उप अधीक्षक योगेश रांजणकर API चावरे, PSI  बेलसरे ,PSI किशोर मित्तरवार PSI मुसळे , NPC किशोर बोडे, PC सुरज मेश्राम PC दिनेश मेश्राम PC फुलचंद लोधी व इतर पोलीस स्टाफ यांनी केली.

Comments