गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा अभिनव उपक्रम.

गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा  अभिनव उपक्रम.  गणेश मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक बंडू देऊळकर व आपला दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने समाज उपयोगी उपक्रम. विराट गणेश मंडळाकडून मोफत हेल्थ चेकअपचा लाभ घेण्याचे आवाहन. वरोरा : गणेशोत्सवाच्या उत्साहाला समाजसेवेची जोड देत मोरया गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी चौक आणि शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र, टिळक वॉर्ड क्रमांक ३, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक २ मध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात एकूण १११ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ७० पुरुष आणि ४१ महिलांचा समावेश होता. नागरिकांची बीपी, शुगर तसेच आवश्यक रक्त तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर संबंधित नागरिकांना पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नियमित आरोग्य तपासणी करून आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. शिबिरासाठी डॉ. गोविंद सिंग, वैभव ठाकरे, ओम उगले, सेजल बोरकर (टेक्निकल लॅब), समृद्धी दडमल (टेक्निकल लॅब), महादेव क...

स्वर्गीय विनायकराव वझे स्मृती प्रित्यर्थ भव्य मॅमोग्राफी टेस्ट शिबिराचा समारोप

स्वर्गीय विनायकराव वझे स्मृती प्रित्यर्थ भव्य मॅमोग्राफी टेस्ट  शिबिराचा समारोप

वरोरा
चेतन लूतडे 

स्वर्गीय विनायकराव वझे स्मृती प्रित्यर्थ भव्य मॅमोग्राफी टेस्ट  शिबिराचा समारोप करण्यात आला.यावेळी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे कर्करोग संबंधित 134 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये संभावित 6 रुग्णांना सावंगी मेघे हॉस्पिटल वर्धा येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. मॅमोग्राफी टेस्ट वरोरा शहरासाठी अशीच सुरू राहील अशी ग्वाही देत सागर वझे यांनी या शिबिराचा समारोप केला.


महिलांमधील वाढत्या कर्करोगाचे प्रमाण लक्षात घेऊन वरोरा व भद्रावती तालुक्यातील गरजू महिलांसाठी  कर्करोगाची तपासणी व निदान शिबिर उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे १ जुलै ते ५ जुलै २०२३ रोजी घेण्यात आले होते.

आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या विशेष सहकार्याने स्वर्गीय विनायकराव वझे स्मृतिप्रित्य सुयोग हॉस्पिटल वरोरा, बीजेपी पक्ष, व रोटरी क्लब वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर दिनाच्या औचित्याने डॉक्टर सागर वझे यांनी या शिबिराचे आयोजन केले आहे.

Comments