वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

भद्रावती जवळील चंदनखेडा फाट्याजवळ अपघात

भद्रावती जवळ चंदनखेडा फाट्याजवळील महामार्गावर रेसर बाईक चा अपघात झाला  असून यामध्ये दोन मुलाचा मृत्यू झाला. यावेळी बाईक स्वार हेल्मेट घालून नसल्याने युवकांना जबर मार लागला. एकाच्या जागीच मृत्यू झाला. वरोरा शहरातील रहिवासी असून मित्र परिवारात शोकाकुल वातावरणात पसरले आहे.  हर्षल पाचभाई  व  अंकुश सुनील भडगरे वय 23 राहणार वरोरा याला चंद्रपूर येथे उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
हे दोघेही मुले भद्रावतीला जात असताना हा अपघात घडला. 

जाहिरात
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकी मध्ये स्वतंत्र उमेदवार नितीन मत्ते 
येत्या 28 तारखेला भरघोस मताने विजयी करा.
घोषणापत्र
उत्पन्न बाजार समिती मध्ये निवडून आल्यास शेतकऱ्यांच्या गरीब मुलांसाठी वस्तीगृह निर्माण करणे.
शेतकऱ्यांचे एक मत नितीनभाऊ मत्ते साठी


Comments