संस्कार भारती पब्लिक स्कूलमध्ये सीबीएसईच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन

संस्कार भारती पब्लिक स्कूलमध्ये सीबी एसई च्या तायक्वांदो आणि व्हॉलीबॉल स्पर्धांचे  आयोजन वरोरा : संस्कार भारती पब्लिक स्कूल, वरोरा येथे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) वतीने दिनांक 21 ते 24 जूनला तायक्वांदो आणि व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धांमुळे वरोरा शहराला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळणार आहे. शाळेच्या प्राचार्या राणी पटेल यांनी माहिती देताना सांगितले की, शाळेत होणाऱ्या तायक्वांदो झोनल स्पर्धेत बंगळुरू, पुणे आणि तिरुवनंतपुरम विभागातील एक हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होण्याची शक्यता आहे. वरोरा परिसरात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेचे आयोजन होत आहे. तायक्वांदो स्पर्धेनंतर लगेचच सीबीएसईच्या क्लस्टर-९ स्तरावरील व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, दमण-दीव तसेच दादरा आणि नगर हवेली या प्रदेशांतील विद्यार्थी सहभागी होणार असून, या स्पर्धा केवळ मुलांच्या गटासाठी असतील. या दोन्ही स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी नागरिक, पालक आणि क्रीडाप्रेमींनी सहकार्य करावे, असे आवाहन प्राचार्या रा...

वरोऱ्यात शिंदे गटाच्या वतीने ८ आणि ९ मार्च रोजी राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा

वरोऱ्यात शिंदे गटाच्या वतीने ८ आणि ९ मार्च रोजी राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा 

वरोरा : अनिल पाटील
स्व. ॲड मोरेश्वर टेमुर्डे आणि स्व. डॉ विनायक वझे यांच्या स्मृती प्रित्यर्थ वरोरा येथे खुल्या राज्य स्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन शिंदे गटाच्या तालुका शिवजयंती उत्सव समिती च्या वतीने करण्यात आले आहे.

दि ८ आणि ९ मार्च ला  आंबेडकर चौक नाका  वरोरा येथे ही स्पर्धा होणार आहे.
भारतीय राज्य घटनेत कालानुरूप बदल करणे आवश्यक आहे कीवा नाही या विषयावर सदर वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक सात हजार, द्वितीय पारितोषिक पाच हजार रुपये आणि तीन हजार रुपये तृतीय परितोषिक  दिले जाणार आहे .या सोबतच काही उत्तेजनार्थ  आकर्षक  बक्षिसे ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेत स्पर्धकांनी बहुसंख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष  नितीन मत्ते  यांनी केले आहे.

Comments