वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

राष्ट्रीय सेवा योजना शिबिर म्हणजे संस्काराची गंगोत्री - जयंत टेमुर्डेतालुक्यातील चालबर्डी येथे रासेयो शिबिराचा समारोप

राष्ट्रीय सेवा योजना शिबिर म्हणजे संस्काराची गंगोत्री - जयंत टेमुर्डे

तालुक्यातील चालबर्डी येथे रासेयो शिबिराचा समारोप

 


 भद्रावती : महाविद्यालयांमध्ये मिळणारे संस्कार हे शैक्षणिक असतात. परंतु राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मिळणारे संस्कार हे संस्कारशील असतात. हे संस्कार अनुभवप्रधान असतात. या सात दिवसीय शिबिरातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांनी पुढे आदर्श नागरिक म्हणून जगण्यासाठी केला पाहिजे असे विचार विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा या शैक्षणिक संस्थेचे कार्यकारी सदस्य जयंत टेमुर्डे यांनी व्यक्त केले. ते तालुक्यातील चालबर्डी (रै) या गावात सुरू असलेल्या सात दिवशीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय गुरुदेव स्वच्छ जल संस्था वरोरा चे अध्यक्ष रमेश राजूरकर होते. यावेळी मंचावर स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर चे अध्यक्ष रवींद्र शिंदे, प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक मित्र मंडळाचे सचिव माधव कवरासे,सरपंच प्रियंका सोयाम, उपसरपंच गणेश नागपुरे, पोलीस पाटील देऊबाबा परसे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हितेश बावणे, मुख्याध्यापक अनिल माथनकर, राष्ट्रीय सेवा योजनेच्या जिल्हा समन्वयक डॉ. विजया गेडाम, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. उत्तम घोसरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. घोसरे संचालन कार्यक्रम सहधिकारी डॉ. रमेश पारेलवार तर आभार प्रदर्शन प्रा. अमोल ठाकरे,प्रा.संगिता बांबोळे यांनी केले.  पल्लवी आस्वले, आदेश देहारकर या शिबिरार्थींनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी महाविद्यालयातील डॉ. प्रकाश तितरे, डॉ. गजानन खामनकर,प्रा. मोहित सावे, डॉ. सुहास तेलंग, मुख्य लिपिक सतीश मशारकर, डॉ.यशवंत घुमे यांच्यासह गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने शिबिराची सांगता करण्यात आली.

Comments