वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

धनोजे कुणबी समाज वधू - वर परिचय मेळावा २०२३ मध्ये कृषी तज्ञांचे मार्गदर्शन, उद्योजकता मार्गदर्शन, मोफत आरोग्य तपासणी तसेच सांस्कृतिक महोत्सव

समाजात दुहीची बीजे रोवणे घातक : खासदार बाळू धानोरकर

धनोजे कुणबी समाज वधू - वर परिचय मेळावा २०२३ मध्ये कृषी तज्ञांचे मार्गदर्शन, उद्योजकता मार्गदर्शन, मोफत आरोग्य तपासणी तसेच सांस्कृतिक महोत्सव
चंद्रपूर : आपल्या समाजातील व्यक्ती मोठ्या पदावर जात असेल तर सर्वानी  तन- मन- धनाने सहकार्य केले पाहिजे. धनोजे कुणबी समाज मंदिर लक्ष्मीनगर समिती अध्यक्षानी समाजाला राजकारणा पासून दूर ठेवले पाहिजे असा सल्ला देत समाजोपयोगी, समाजाच्या सर्वागीण प्रगतीसाठी पूर्ण ताकदीने कार्य करावे, समाजात दुहीची बीजे रोवणे  घातक असून भावी पिढी माफ करणार नाही. राजकारण व पक्ष न बघता मला २०१९ च्या निवडणुकीत आपल्या समाजाने भक्कम पाठिंबा दिला. त्याबद्दल खासदार बाळू धानोरकर यांनी समाजबांधवांचे आभार मानले.  

धनोजे कुणबी समाज वधू - वर परिचय मेळावा २०२३ मध्ये कृषी तज्ञांचे मार्गदर्शन, उद्योजकता मार्गदर्शन, मोफत आरोग्य तपासणी तसेच सांस्कृतिक महोत्सव आयोजित करून सुवर्ण संगम साधल्याबद्दल खासदार बाळू धानोरकर यांनी आयोजन समितीचे कौतुक केले. 
या मेळाव्यात रेशीमगाठी या विशेषकांचे प्रकाशन झाले. हा विशेषांक उपवर - वधू साठी उपयुक्त असून भूमिपुत्रांच्या मेळाव्यात कृषी महोत्सव भूषणावह असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. 


याप्रसंगी आमदार प्रतिभाताई धानोरकर, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष टिकाराम कोंगरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, वसंत जिनींगचे अध्यक्ष आशिष कुलसंगे, धनोजे कुणबी समाज मंदिर लक्ष्मीनगरचे अध्यक्ष पुरुषोत्तम सातपूते, चंद्रपूर मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकर, चंद्रपूर मनपाचे स्थायी समितीचे माजी सभापती राहुल पावडे, श्रीधर मालेकर, संजय खाडे, देविदास काळे, ऍड. संतोष कुचनकर यांची उपस्थिती होती.    

याप्रसंगी आमदार प्रतिभाताई धानोरकर बोलताना म्हणाल्या कि, धनोजे कुणबी समाजात जन्माला आलो. याच्या अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु एकीकडे महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करतो. आणि दुसरीकडे समाजातील महिलांचे पाय मागे खीचल्या जातात. हि बाब दुर्दैवी असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे महिलांचे मनोबल कमी होत असते. परंतु मी घाबरणारी महिला नसून लढणारी महिला आहे. मी १२ पुरुषा विरोधात निवडणूक लढूनआलेली लोकप्रतिनिधी हे. प्रामाणिकपणे काम करणारी लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे जनता माझ्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले.


जाहिरात  

Comments