गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा अभिनव उपक्रम.

गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा  अभिनव उपक्रम.  गणेश मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक बंडू देऊळकर व आपला दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने समाज उपयोगी उपक्रम. विराट गणेश मंडळाकडून मोफत हेल्थ चेकअपचा लाभ घेण्याचे आवाहन. वरोरा : गणेशोत्सवाच्या उत्साहाला समाजसेवेची जोड देत मोरया गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी चौक आणि शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र, टिळक वॉर्ड क्रमांक ३, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक २ मध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात एकूण १११ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ७० पुरुष आणि ४१ महिलांचा समावेश होता. नागरिकांची बीपी, शुगर तसेच आवश्यक रक्त तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर संबंधित नागरिकांना पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नियमित आरोग्य तपासणी करून आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. शिबिरासाठी डॉ. गोविंद सिंग, वैभव ठाकरे, ओम उगले, सेजल बोरकर (टेक्निकल लॅब), समृद्धी दडमल (टेक्निकल लॅब), महादेव क...

अरविंदो रियालटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची दादागिरी.

अरविंदो रियालटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची दादागिरी,

 बेलोरा गावकऱ्यांनी हाणून पाडली.

वानखडे  यांच्यावर गुन्हा  नोंद करण्यासाठी महिला भद्रावती पोलीसात दाखल.
भद्रावती २७/२/२३
चेतन लूतडे
                पोलीस स्टेशन भद्रावती

भद्रावती तालुक्यातील बेलोरा  गावात अरबिंदू रियालटी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचे कोळसा उत्खनन करण्याचे काम सुरू होत आहे. यासाठी गावकऱ्यांच्या समस्या व पुनर्वसन  व  अवार्ड  घोषित न करता कंपनीने काम सुरू केले. त्यामुळे गावकऱ्यांनी उठाव करून या कंपनीचे काम बंद पाडले.

भद्रावती येथील बेलोरा लगत परिसरात अकरा गावाची 936 एकर  जमीन  अरबिंदू रियलटी इन्फ्रास्ट्रक्चर खाजगी कंपनीला देण्यात येत आहे. यासाठी कंपनीने स्वतःच्या नावावर असलेल्या काही जमिनीवर बांधकाम करण्याचे काम बेलोरा येथे सुरू केले आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यासमोर दोन वेळा जन सुनावणी झाली आहे. मात्र यामध्ये कोणतेही समस्या सुटल्या नव्हत्या. त्यामुळे बेलोरा, टाकळी, जेना,पानवडाळा अशा महत्त्वाच्या गावाच्या सरपंचांनी सोमवारी सकाळी या कंपनीचे काम बंद पडले. कंपनीतर्फे सिंग यांनी कंपनीची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु गावाची पुनर्वसन व एकरी 50 लाख रुपये जमिनीचा मोबदला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कंपनीने कुठलेही काम करू नये अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतल्याने तनाव निर्माण झाला होता.
    सरपंच ,संगीताताई  देहारकर

यावेळेस कंपनीतर्फे वानखेडे यांनी बॉडीगार्ड आणून जबरदस्तीने काम करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे काही गावकऱ्यांनी हात धरून धक्काबुक्की करताच कंपनीचे वानखेडे व सिंग पोलिसांच्या साहाय्याने  तिथून निघून गेले. त्यामुळे अनर्थ टळला.

हाच वाद पुढे घेऊन भद्रावती पोलीस ठाणेदार इंगळे यांच्या दरबारात गेला. यानंतर सुधाकर रोहनकर यांच्या मदतीने कंपनी आणि गावकरी यांच्यात समेट घडवून आणण्यात आला. यामध्ये कंपनीने कुठलेही प्रकारचे काम करू नये असा युक्तिवाद करण्यात आला. व काम बंद करण्यात आले.
बि. सिंग, अरविंद रियालिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, कंपनी . 
यह कंपनी बाकी कंपनी की तरह से
 काम नहीं करेंगी। सभी का मुहाज्बा दिया जाएगा। पुनर्वासन, रोजगार, और सुविधा गांव वालों को दी जाएगी। अभी हमारी शुरुआत है। जल्दी ही काम शुरू किया जाएगा।

 यानंतर महिला गावकऱ्यांनी वानखेडे यांच्यावर भाडोत्री आणून महिलांना धक्काबुक्की करण्याच्या प्रकरणात महिलांनी भद्रावती पोलीसत दाखल करण्यात आली. यावेळी आकाश वानखेडे यांच्यावर 504 ,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

गावकऱ्यांच्या या आंदोलनात राष्ट्रवादीचे तालुकाप्रमुख सुधाकर रोहनकर यांच्यासह गावातील बेलोरा सरपंच संगीता ताई देहारकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते.

आकाश वानखेडे 
पैलवान माझ्या निजी अंगरक्षकासाठी आहे.मी 16 लोकांना न्याय मिळवून दिला. कंपनी बाकीच्या शेतकऱ्यांचे प्रश्न नक्की लवकरात लवकर सोडवेल. मी तिथे १६ शेतकऱ्याच्या वतीने आलो होतो. माझ्यावर चुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

जाहिरात.
चेतन लुतडे वरोरा
९५७९७३४४२९

Comments