वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

शिवसेनेचा आज महिला मेळावा, पक्षप्रवेश सोहळा

शिवसेनेचा आज महिला मेळावा, पक्षप्रवेश सोहळा
वरोरा ः शिवसेनेच्या पूर्व विदर्भसंपर्क नेत्या शुभांगी नांदगावकर यांचे मंगळवारी (ता. २१) वरोऱ्यात आगमन होत आहे. यानिमित्ताने येथील धनोजे कुणबी सभागृहात दुपारी बारा वाजता महिला मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, महिला संघटिका, पदाधिकारी, तालुक्यातील नगरसवेक, ग्रामपंचायत सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख योगिता लांडगे यांनी केले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नित्तीन मत्ते, सहसंपर्कप्रमुख बंडू हजारे यांच्या सूचनेनुसार हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शिवसेनेच्या या महिला मेळाव्याला जिल्ह्यातील महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी केले आहे.

जाहिरात विभाग.
आजच भेट द्या....

Comments