वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, वरोरा यांनी नोंदविलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने आरोपींना ठोठावला दंड


निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, वरोरा यांनी नोंदविलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने आरोपींना ठोठावला दंड

Chetan lutade
दि. १७/१२/२०२२

परवाना कक्षातच मध्य प्रेमींनी दारू प्राशन करावी.

नागपूर-चंद्रपूर रोडवरील मौजे लोणारा, ता. भद्रावती, जिल्हा चंद्रपूर येथील हॉटेल हॅप्पी सेवन डे या ढाब्यावर ग्राहकांना अवैधरीत्या मद्य पिण्याचे परवानगी देतात अशा खात्रीदायक बातमीवरून दि. २५/०९/२०२२ रोजी श्री. विकास बी. थोरात, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, वरोरा यांच्या पथकाने सदर हॉटेलवर दारूबंदी गुन्ह्याकामी छापा घातला असता हॉटेल चालक हा अवैधरीत्या व कसलाही दारूचा परवाना नसतांना चार (०४) ग्राहकांना त्याच्या हॉटेलमध्ये अवैधरीत्या दारू पिण्यास परवानगी दिल्याचे आढळले. त्यावरून सदर ठिकाणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ अ, ब तसेच ८४ अन्वये गुन्हा नोंद करुन मद्यसेवन करणारे ०४ इसम व हॉटेल मालक अशा ०५ इसमांना अटक करण्यात आली. सदरच्या सर्व आरोपींना पुढील २४ तासाचे आत मा. न्यायालयासमोर हजर करून दोषारोपपत्र सादर करण्यात आले. मा. न्यायालयाने मद्यपी आरोपींना दि. १७/१२/२०२२ रोजी दंड ठोठावल्याने  चंद्रपूर जिल्ह्यातील हि पहिलीच घटना ठरली आहे.

सदर कारवाई ही श्री. मोहन वर्दे, विभागीय उपआयुक्त, रा. उ. शु., नागपूर विभाग, श्री. संजय पाटील, अधीक्षक, रा. उ. शु., चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विकास बी. थोरात, निरीक्षक, रा. उ. शु., वरोरा, श्री. संजय आक्केवार, दु. निरीक्षक, श्री. चंदन भगत, स. दु. निरीक्षक, श्री. उमेश जुंबाडे, जवान, श्री. किशोर पेदुजवार, जवान, श्री. सुजित चिकाटे, जवान व श्री. दिलदार रायपुरे, जवान-नि-वाहनचालक यांनी पार पाडली.
नाताळ व ३१ डिसेंबर च्या पार्श्वभूमीवर नागरीकांना आवाहन करण्यात येते कि, वरील प्रकारची कारवाई यापुढेही सतत सुरु राहणार आहे. त्यामुळे मद्यप्रेमींनी अवैध धाब्यावर किंवा अवैध ठिकाणी मद्य न पिता अधिकृत परवाना कक्षातच मद्य प्राशन करावे.


Comments