वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

विवेकानंद महाविद्यालयात "भगवान बिरसा मुंडा" जयंती साजरी

विवेकानंद महाविद्यालयात "भगवान बिरसा मुंडा" जयंती साजरी


भद्रावती :   स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांची जयंती "जनजातीय गौरव  दिवस"  विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पत्रकानुसार आयोजित करण्यात आली होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. यशवंत घुमे होते. प्रमुख अतिथी म्हणून वाणिज्य विभागप्रमुख डॉ. विजय टोंगे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. उत्तम घोसरे, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. बंडू जांभुळकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना  "मानव जातीला आपले हक्क प्राप्त करून घेण्यासाठी भगवान बिरसा मुंडांनी जी चळवळ उभारली त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात नवचैतन्य निर्माण झाल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. अमोल ठाकरे, प्रास्ताविक डॉ. बंडू जांभुळकर, आभारप्रदर्शन डॉ.उत्तम घोसरे यांनी केले. यावेळी ग्रंथालय विभागप्रमुख डॉ. सुधीर आष्टुनकर, मराठी विभागप्रमुख डॉ. रमेश पारेलवार, इतिहास विभागप्रमुख डॉ. जयवंत काकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Comments