वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

ऐतिहासिक भद्रावती नगरीत २३ नोव्हेंबर पासून वी एस सी चषक व्हॉलीबॉल स्पर्धा.

ऐतिहासिक भद्रावती नगरीत २३ नोव्हेंबर पासून वी एस सी चषक व्हॉलीबॉल स्पर्धा.

भद्रावती:- विवेकानंद स्पोर्टिंग क्लब व विवेकानंद महाविद्यालय भद्रावती यांचा संयुक्त विद्यमाने विवेकानंद स्पोर्टिंग क्लब ला २५ वर्ष पूर्ण होत असल्याने रोप्य महोत्सव रूपी महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य स्तरीय सब जूनियर गट आंतर विभागीय वॉलीबाल स्पर्धा दिंनाक २३ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान विवेकानंद महाविद्यालय च्या भव्य पटंगनावर दिवस व रात्र कालीन आयोजित करण्यात आली आहे।

या स्पर्धेकरिता विद्युत प्रकाश झोतातील दोन मैदाने सज्ज असून ही स्पर्धा दिवस व रात्र अश्या सत्रात खेळवली जाणार आहे या वी. एस. सी . चषक  स्पर्धेतून महाराष्ट्र संघ निवडला जाणार आहे. निवड झालेला संघ पुढील राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धेकरीता भद्रावती वरून रवाना होईल अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

या वी एस सी चषक स्पर्धेकरिता ८ विभागातून (कोल्हापुर विभाग, नाशिक विभाग,पुणे विभाग,मुंबई विभाग, औरंगाबाद विभाग, लातूर विभाग, अमरावती विभाग व यजमान नागपुर विभाग) यांचे मुले व मुलींचे संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेकरिता २५० खेळाडू सहित पधाधिकारी पंच सहभागी होत आहे.महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष - प्रतीक जयंतराव पाटील व सचिव- विरल शाह यांच्या मार्गदर्शनात स्पर्धा यशश्वी करण्याकरीता विवेकानंद स्पोर्टिंग क्लब व विवेकानंद महाविद्यालय भद्रावती स्पर्धा यशश्वी संपन्न करण्यासाठी परिश्रम घेत आहे. सोबतच स्पर्धेचा एक भाग म्हणून ६ नोव्हेंबर ला नागपूर विभागीय संघाची निवड चाचणी सुद्धा विवेकानंद स्पोर्टिंग क्लब च्या वतीने घेऊन नागपूर विभागीय मुले व मुलींच्या संघाची  निवड करण्यात आली आहे.

Comments