लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

गणेश मंडळ अध्यक्ष व मान्यवर व्यक्ती चे मुस्लिम बांधवांतर्फे सत्कार कार्यक्रम संपन्न.

गणेश मंडळ अध्यक्ष व मान्यवर व्यक्ती चे मुस्लिम बांधवांतर्फे सत्कार कार्यक्रम संपन्न.   
               वरोरा येथील सार्वजनिक गणेश उत्सव विसर्जन दरम्यान वरोरा येथील कच्ची मज्जिद  जवळ मंडप मध्ये गणेश मंडळ अध्यक्ष व लोकप्रतिनिधी अधिकारी यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार मुस्लिम समाज बांधवांतर्फे करण्यात आला. वरोरा हे शांत शहर असून इथे मोहरम गणपती व इतर उत्सव सर्व समाजातील नागरिक एकत्र येऊन करतात जेणेकरून या शहरात एकोबा कायम रहावा व तसेच सर्वधर्म समभाव चे संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम या शहराने मागील अनेक वर्षापासून केले आहे त्याचाच एक भाग म्हणून मागील अनेक वर्षापासून शेख जैरुदिन.छोटुभाई माजी सभापती तथा जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया कोमी  तऺजिम व त्यांचे सहकारी सामाजिक कार्यकर्ता आसिफ भाई रजा यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सर्व मंडळाचे अध्यक्ष व त्यासोबतच खासदार बाळूभाऊ धानोरकर. आयुष नेपानी पोलीस उपविभागीय अधिकारी तथा आयपीएस .श्री शिंदे साहेब उपविभागीय अधिकारी. मुख्याधिकारी श्री गजानन राव भोयर .व इतर सुद्धा अधिकारी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांचा सत्कार केला यावेळी उपस्थित माजी सभापती रुहिना शेख. रहमान भाई सलीम भाई रशीद भाई शेख आयुब भाई व इतर  जयंता चौधरी फिरोज भाई गोलू पाठक उपस्थित राहून सहकार्य केले

Comments