लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वडिलांची राहत्या गावात आत्महत्या ?

 वडिलांची राहत्या गावात आत्महत्या

हत्या आणि आत्महत्या करण्याच्या पहिले वडीलाची चिठ्ठी मध्ये विनंती.

वडिलांनी पाजले स्वतःच्याच दोन मुलांना विष

वरोरा
चेतन लूतडे

वरोरा तालुक्यातील बोर्ड परिसरात वडिलांनी स्वतःच्या मुलाना विष पाजून हत्या करण्यात आल्याची दुःखद घटना घडली आहे.

वरोरा शहरा लगत बोर्डा या गावांमध्ये कांबळे परिवार राहत असून संजय श्रीराम कांबळे हे शिकवणी वर्ग घेण्याचे काम करत होते. गेल्या काही दिवसापासून मानसिक परिस्थिती ढासळल्याने शिकवणी वर्ग सुद्धा बंद करण्याच्या मार्गावर आले होते. त्यांची पत्नी कॉलेजमध्ये कंत्राटी बेस वर काम करत असून संसार सुरळीत चालला होता.

मात्र या सुखी संसाराला वडिलांची नजर लागली . दोन्ही मुलांना सुमित संजय कांबळे 7 वर्ष, मुलगी मिस्त्री संजय कांबळे 3वर्ष, या दोघांनाही राहत्या घरी विष देऊन हत्या करण्यात आली. यानंतर मुलाची आई घरी आल्यानंतर दार उघडून पाहताच दोन्ही मुले बेडवर पडून असल्याचे दिसतात आईने आरडाओरडा सुरू केला . लगेच दोन्ही मुलांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत दोन्ही मुलाची प्राणज्योत मावळली होती.  कुटुंबातील परिवारावर शोक कळा पसरली असून प्राथमिक अंदाजानुसार विष पाजून व मुलांचा गळा आवळून हत्या केली असल्याचा अंदाज वरोरा येथील उप रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केला जात आहे. 
या घटनेने परिसरात स्मशान शांतता पसरली असून वरोरा पोलीस आरोपीचा शोध घेण्यासाठी कसून प्रयत्न करीत होते.
३/९/२२ मंगरूळ रोडवर वडीलाची आत्महत्या
आज सकाळी समुद्रपूर येथील साखरा येथील राहत्या गावात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीस पुढील तपास घेत असून संजय कांबळे याचा मृतदेह मंगरूळ रोड नजीक एका शेतामध्ये आढळला असून असून गिरड पोलीस पुढील तपास करीत आहे. 
मुलांना मारल्यानंतर एक चिठ्ठी सुद्धा सोडण्यात आली होती. त्यामध्ये मी स्वतः मुलांना मारत असल्याची कबुली देत नातेवाईक व इतर लोकांना त्रास न देण्याची विनंती चिठ्ठी मध्ये करून ठेवली होती. मात्र मुलांना व स्वतः आत्महत्या करण्याचे कारण चिठ्ठी मध्ये नमूद केले नव्हते.
त्यामुळे आत्महत्या आणि दोन लहान मुलांची हत्तेचे कारण अजूनही कळू शकले नाही.

मात्र आर्थिक विवेचनेतून ही आत्महत्या व हत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Comments