लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

सदाशिव ताजनेचे कार्य धडधाकट माणसाला लाजविणारे- डॉ. विकास आमटे

*सदाशिव ताजनेचे कार्य धडधाकट माणसाला  लाजविणारे- डॉ. विकास आमटे*
वरोडा : श्याम ठेंगडी
सदाशिव ताजने यांचे कार्य धडधाकट माणसाला पण लाजविणारे आहे, त्यांचे आनंदवनातील पदार्पण आणि माझी कार्याची सुरुवात 1971 पासून सुरू झाली,स्वरानंदवनच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत अनेक कार्यक्रम महाराष्ट्र भर  केलेली आहेत. अपंग असलेल्या ताजनेकडून प्रत्येकांनी प्रेरणा घेतली पाहिजे असे प्रतिपादन आनंदवनाचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी केले . 
     आनंदवनातील विश्वस्त तथा स्वरानंदवनचे मुख्य व्यवस्थापक सदाशिव ताजने यांच्या वाढदिवसानिमित्त आज २३ सप्टेंबरला आनंदवनात डॉ. गोविंद कासट लिखित " बाबा आमटे यांच्या आनंदवनातील सदाशिव ताजने " 
या पुस्तकाच्या 13 व्या आवृत्तीचे प्रकाशन डॉ. विकास आमटे यांचे हस्ते त्यांच्या निवासस्थानी पार पडले.
       माजी राज्यपाल रा. सु. गवई यांच्या पत्नी श्रीमती कमलताई गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला डॉ. भारती आमटे , ज्येष्ठ समाजसेवक डॉ. गोविंद कासट,प्राचार्य. सुभाष गवई ,माजी नगरसेवक प्रभाताई आवारे, उमा कासट, आनंदवनाचे आरोग्य अधिकारी डॉ विजय पोळ, विश्वस्त सुधाकर कडू ,माधव कवीश्वर,ज्येष्ठ नागरिक संघाचे सोनेकर सर,  पराते,  अशोक मगरे आदी उपस्थित होते.
    याप्रसंगी ताजने यांचा डॉ. विकास आमटे व लेडीगव्हर्नर कमलताई गवई यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी डॉ. गोविंद कासट आपल्या भाषणात म्हणाले ,डॉ. विकास आमटे यांच्या यावर्षी अमृत महोत्सवानिमित्त अमरावतीकरांसाठी 12 महिन्याच्या भेटीचे आयोजन करण्यात आलेले असून ही 11 व्या महिन्याची भेट आहे,     येणाऱ्या 27 ऑक्टोबरमध्ये शेवटची 12 महिन्याची भेट असून या 12 भेटीवर डॉ. विकास आमटे यांचा अमृत महोत्सव म्हणून पुस्तक प्रकाशन करण्याचे ठरविलेले आहे, हे सर्व घडवून आणण्यासाठी आम्हाला सदाशिव ताजने हे महत्वाचे दुवा म्हणून काम करतात , याशब्दात त्यांनी  गौरवाउद्गार काढलेले होते. 
  कार्यक्रमानंतर स्वरानंदवन मध्ये पाहुण्यांना संगीत कार्यक्रम सुद्धा दाखवीण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. गोविंद कासट यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेश ताजने यांनी मानले।

Comments