वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

भद्रावतीची साची जिवने ठरली मिस टीन इंडिया*

*भद्रावतीची साची जिवने ठरली मिस टीन इंडिया* 

भद्रावती:- येथील नवीन सुमठाणा वार्डातील रहिवासी साची चंदू जिवने ही नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय मिस टीन इंडिया टॅलेंटेड २०२२ या स्पर्धेत पहिल्या पाच विजयी स्पर्धकांत स्थान प्राप्त करून यशस्वी ठरली आहे.
      साची जिवने ही सध्या एम.जी.एम.विद्यापीठ औरंगाबाद येथे इलेक्ट्रॉनिक मिडिया या विषयात बी.ए.प्रथम वर्षाला शिकत आहे. तिचे वडील ऑटो चालक असून आई आयुध निर्माणीत चार्जमन आहे. ॲली क्लब नवी दिल्ली तर्फे 'मिस ॲन्ड मिस्टर टीन इंडिया-२०२२' या स्पर्धेचे आयोजन दिल्ली येथील सेवन सीज हाॅटेलमध्ये  करण्यात आले होते. मागील २४ वर्षांपासून ही संस्था या स्पर्धेचे आयोजन करत आहे. यंदाच्या स्पर्धेत संपूर्ण देशातील विविध प्रांतातील ७० स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात पहिल्या पाच विजयी स्पर्धकांत स्थान प्राप्त करण्याचा मान साचीला मिळाला. यावेळी अभिनेता आयुब खान आणि अभिनेत्री पूजा बॅनर्जी यांच्या हस्ते साचीला पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
      सदर स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी साचीने ऑडिसन दिले होते. त्यात २००० स्पर्धकांमध्ये तिची निवड करण्यात आली होती. स्पर्धेत परीक्षक म्हणून यावेळी संजय कपूर, तुषार कपूर, मनोज तिवारी, पूजा बॅनर्जी, तनाज इराणी, आयुब खान, शाहबाज खान इत्यादी सेलिब्रिटींची उपस्थिती होती. 
      विशेष म्हणजे दि.६ ऑगस्ट रोजी साचीच्या वडिलांचा अपघात झाला होता. ते रुग्णालयात उपचार घेत होते. त्यामुळे ती स्पर्धेत सहभागी व्हायला तयार नव्हती. परंतु वडिलांनी तिला प्रोत्साहन दिले. त्यामुळे ती तयार झाली आणि तिला यश प्राप्त झाले. तिचे नृत्य शिक्षक सागर मामिडवार यांचेही तिला प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Comments