लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

मित्राला वाचवण्यासाठी घेतली उडी.

चारगाव धरणात बुडून दोन युवकाचा मृत्यू... 
 
मित्राला वाचवण्यासाठी घेतली उडी.

मनोज गाठले,शेगाव 
वरोरा

वरोरा तालुक्यातील  चारगाव धरण येथे आज दुपारच्या सुमारास दोन युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

 बाहेर गावी शिकत असल्याने आज पोळ्या निमित्याने कॉलेज ला सुट्ट्या लागल्या असल्याने आनंद घेण्यासाठी  फिरण्याचा बेत घेऊन सर्व मित्र एकत्र येऊन चारगाव धरण येथे जाण्याचा बेत घेतला व इथे आले होते . सदर धरणाचे मनमोहक दृश्य पाहून फोटो काढण्यात सुरुवात केली तेव्हा मृतक हार्दिक विनायक गुळघाणे राहणार शेगाव बू.हा सेल्फी फोटो काढण्या करिता गेला असता पाय  घसरून पाण्यात पडला. तेव्हा मृतक आयुष चीडे राहणार वरोरा हा  त्याला वाचविण्या करिता गेला असता तो सुधा पाण्यात पडला . तेव्हा या दोघाचा मृत्यू झाला..  यात हार्दिक विनायक गुळघाने वय १९ वर्ष राहणार शेगाव बू... तर दुसरा आयुष चिडे याचा जागीच मृत्यू झाला.  याची माहिती  शेगाव पोलीस स्टेशन शेगाव चे ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांनी घटना स्थळ गाठून मुलांना  बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गावातील श्री रामकृष्ण भट यांच्या सहकार्याने नाव्ह व लोखंडी गळ च्या साह्याने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले ...सदर मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदन करण्या करिता उप जिल्हा रुग्णालय वरोरा येथे नेण्यात आले . 

        मृतक युवक सोबत त्यांचे मित्र श्वेतम जयस्वाल राह.शेगाव बू. मयूर पारखी राह.वरोरा. आश्रय गोळगोंडे राह.वरोरा.हे मित्र तलाव बाहेर असल्याने त्यांचे प्राण वाचले...

Comments