वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना  पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त खालील प्रमाणे जाहीर करण्यात आले आहेत अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस  आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

 *उपजिल्हाप्रमुख* अमित निब्रड वरोरा भद्रावती विधानसभा.
 *विधानसभा संघटक* सुधाकर मिलमिले वरोरा भद्रावती विधानसभा.
 *विधानसभा समन्वयक* ज्ञानेश्वर डुकरे वरोरा भद्रावती विधानसभा.
 *तालुकाप्रमुख* नरेंद्र पडाल भद्रावती तालुका,
विपिन काकडे वरोरा तालुका,
राकेश सोनवणे सिंदेवाही तालुका

 *तालुका संघटक* बाळकृष्ण शिरसागर भद्रावती.

 *शहर प्रमुख* घनश्याम आसवले भद्रावती शहर,
सरताज सिद्दिकी माजरी शहर

 *मीडिया प्रमुख* गणेश चिडे वरोरा भद्रावती विधानसभा

वरील सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन चंद्रपूर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे व युवा सेना जिल्हा चिटणीस मनीष जेठानी, संदीप मेश्राम शिवसेना वरोरा शहर प्रमुख
यांनी केले आहे.

Comments