लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोरा येथे विविध सामाजिक संघटने तर्फे डॉ. अब्दुल कलाम यांना आदरांजली अर्पण

*वरोरा येथे विविध सामाजिक संघटने तर्फे डॉ. अब्दुल कलाम यांना आदरांजली अर्पण*

                 

 *वरोरा* :  भारताचे ११ वे राष्ट्रपती आणि जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. अवुल पकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम यांच्या ७ व्या स्मृतिदिनी त्यांना  विविध सामाजिक संघटने तर्फे येथील डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम चौकात आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुदेव सेवा मंडळाचे उप  सेवाधिकारी लक्ष्मणराव गमे हे होते. मुख्य अतिथी कार्यक्रमात वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी  मधुकर राव राठोड, नगर परिषदेचे माजी सभापती तथा जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया कुमी तजिम छोटुभाई शेख, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. हेमंत खापने, गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा सेवाधिकारी रुपलाल कावळे आबाजी देवाडकर अध्यक्ष पेन्शनर संघ वरोरा, जेष्ठ नागरिक संघाचे सचिव मारोतराव मगरे, निबुदे जी जिल्हाध्यक्ष जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्था पत्रकार तथा आनंदवन मित्र मंडळाचे सचिव राजेंद्र मर्दाने, अनिल झोटिंग माजी उपाध्यक्ष माजी सैनिक संघटनेचे सागर कोहळे,  प्रवीण चिमूरकर, माजी नगरसेवक सनी गुप्ता लोंढे गुरुजी  पाल सर. मोहसीन पठाण परदे जी प्रमोद निकाळे प्रामुख्याने उपस्थित होते. 
     कावळे म्हणाले की, एक गरीब परिवारातील मुलगा ते महान वैज्ञानिक आणि देशाचे राष्ट्रपती असा डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जीवणप्रवास थक्क करणारा आणि तितकाच विद्यार्थ्यांना व तरुणांना प्रेरणा देणारा आहे. 
    आपल्या अध्यक्षीय भाषणात गमे म्हणाले की, डॉ. अब्दुल कलाम यांचे विचार युवापिढीने आत्मसात करणे गरजेचे आहे. छोटुभाई यांच्या पुढाकाराने विविध संघटनेच्या माध्यमातून डॉ. कलाम चौक येथे या कार्यक्रमाचे आयोजन खरंच कौतुकास्पद आहे.
   याप्रसंगी डॉ. हेमंत खापने, राजेंद्र मर्दाने, अध्यक्ष पेन्शन संघ  देवाडकर, मारोतराव मगरे, सागर कोहळे यांनी डॉ. अब्दुल कलाम याच्या जीवनावर प्रकाश टाकला. 
   सुरुवातीला मान्यवरांनी डॉ अब्दुल कलाम यांच्या  तैलचित्रावर पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली तदवतच् दौन मिनट मौन धारण करून डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
      

Comments