लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

विजेच्या कडकडामध्ये विज पडून चौघांचा जागीच मृत्यू

विजेच्या कडकडामध्ये विज पडून चौघांचा जागीच मृत्यू

वीज कोसळल्याने झाडे परिवारातील तीन व एक गजभे परिवारातील शेतकऱ्यांचे जागीच मृत्यू

वरोरा तालुक्यातील वायगाव भोयर येथील घटना.

वरोरा
चेतन लूतडे 

वरोरा तालुक्यातील चारगाव बू. येथून जवळच असलेल्या वायगाव भोयर येथे आज चार वाजताच्या सुमारास शेतात काम करीत असलेल्या महीलावर  वीज  पडून मरण पावल्याची घटना घडली..

 झाडे परिवारातील शेतात कापूस नींदनीचे  काम करीत असताना आज दुपारच्या सुमारास चार वाजताच्या सुमारास वायगाव येथील शेत शिवारात विजेच्या गडगडटासह  मुसळधार पावसाने हजेरी लावली यावेळी शेतात काम करीत असलेले शेतकरी एकाएकी मोसम बदलल्याने घराकडे निघत असताना पाऊस लागल्याने झाडाचा आश्रय घेत थांबले असताना चार महिलांवर अचानक विज कोसळल्याने या महिलांचा जागीच मृत्यू झाला.

 यात  हिरावती शालिक झाडे  वय ४५ वर्ष  राहणार वायगाव भोयर.माजी पंचायत समिती वरोरा सदस्य ..  
पार्वता रमेश झाडे वय ६० वर्ष राहणार वायगाव , 
 मधुमती सुरेश झाडे वय २० वर्ष राहणार वायगाव  ,
 रीना नामदेव गजभे वय वर्ष २० वर्ष राहणार वायगाव भोयर . अशा चार महिलांचा जागीच मृत्यू झाला तर यात दोन महिला दोन मुली . याचा मृत्यू झाला असल्याने गावात तसेच परिसरात शेतकरी शेतमजूर मध्ये भीती निर्माण झाली असून गावामध्ये शोक कळा पसरली आहे.

 या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पंचनामे करून आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावे अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी केली आहे ......

 याची माहिती शेगाव पोलीस स्टेशन दिला असता येथील ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पंचनामा स्टेशन चे psi श्री प्रवीण जाधव , श्री किशोर पिरके , श्री महादेव सरोदे  कर्मचारी करीत आहे ..

Comments