लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

प्रेम प्रकरणाच्या वादातून पित्याची हत्या.

प्रेम प्रकरणाच्या वादातून पित्याची हत्या.

आरोपीला अटक.

माजरी- 

काही दिवंसापूर्वी माजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरोरा-वणी महामार्गावरील कुचना-पाटाळा दरम्यान कोराडी नाल्यावरील पुलाखाली एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. त्यानीही ही हत्याच असल्याची माहिती दिली होती.

या व्यक्तीची ओळख पटविण्याचे आव्हान पोलीसांसमोर होते. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करून उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे पथकाचे गठन करून तपासाला सुरुवात केली होती. अखेर या हत्येचे गूढ उकलण्यात पोलीसांना यश आले असून, या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पोलीसांकडून अनोळखी मृतकाचे ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु असतानाच सिकंदर रामभाऊ पाटील रा. माजरी याने पोलीसांनी प्रसिद्ध केलेल्या शोधपत्रिकेनुसार मृतकाचे प्रेत पाहुन ओळखले व सदर व्यक्ती त्याचे वडिल रामभाऊ ज्ञानेश्वर पाटील (५०) रा. आंबेडकर वार्ड माजरी कॉलरी हेच असल्याचे स्पष्ट सांगितले. 

त्यानंतर सदर गुन्ह्याच्या पुढील तपासादरम्यान मृतकाचा मुलगा सिकंदर यास पोलीसांनी विचारपुस केली असता  माजरी कॉलरी येथील रहिवाशी पिंटू पेटकर याचे पत्नीसोबत माझे प्रेमसंबंध असल्याचा संशयातून पिंटू पेटकर हा नेहमी आमचे सोबत वादविवाद करत होता. मला व माझ्या कुटुंबाला मारण्याची धमकी देत होता असे सिकंदरने सांगितले. यावरून आशीष उर्फ पिंटू पेटकर (३२) रा. आंबेडकर वार्ड याला पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यास सदर गुन्ह्यासंबंधाने पोलिसी विचारपूस केली असता त्याने मृतकाचा मोठा मुलगा सिकंदर रामभाऊ पाटील याने माझ्या पत्नीसोबत प्रेमसंबंध प्रस्तापीत करून पळवून नेले व तो भद्रावती येथे राहत आहे. त्यामुळे तो मला मिळत नव्हता.त्यामुळे त्याचा राग मनात धरुन मी सिकंदरच्या वडिलाला दोन साथीदाराच्या मदतीने महावीर स्कूलमध्ये पुरपीड़ित कैम्पमधून चारचाकी गाडी मध्ये जबरदस्तीने बसवून कोराडी नाल्याचे पुलीयाजवळ नेऊन हत्याराने डोक्यावर मारले व पुलाखाली टाकून दिल्याचे आरोपी  कबुली दिली.

याप्रकारणी आरोपी आशीष उर्फ पिंटू पेटकर यांच्या विरुद्ध माजरी ठाण्यात कलम ३०२ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष नोपानी सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी व सहकारी पोलीस करीत आहे.

Comments